''खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूला मारण्याचा प्लॅन होता, पण अमेरिकेने...'': रिपोर्ट

Gurpatwant Singh Pannun: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूला मारण्याची योजना तयार होती, परंतु अमेरिकेमुळे ती फेल ठरली.
Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannu
Khalistani Terrorist Gurpatwant Singh PannuDainik Gomantak
Published on
Updated on

Gurpatwant Singh Pannun: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूला मारण्याची योजना तयार होती, परंतु अमेरिकेमुळे ती फेल ठरली. फायनान्शिअल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन अधिकार्‍यांनी अमेरिकन भूमीवर शीख फुटीरतावाद्यांच्या हत्येचा कट उधळून लावला.

पन्नू हा अमेरिकन आणि कॅनडाचा नागरिक असून तो शीख फॉर जस्टिसचा प्रमुख आहे. वेगळ्या खलिस्तानची मागणी करणारा हा अमेरिकास्थित गट आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची या वर्षी 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियामध्ये हत्या करण्यात आली.

त्यानंतर कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यात भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.

दरम्यान, यूएस फेडरल वकिलांनी पन्नू प्रकरणातील एका गुन्हेगाराविरुद्ध न्यूयॉर्कमधील न्यायालयात कट रचल्याबद्दल सीलबंद आरोपपत्र दाखल केले आहे. सध्या यूएस जस्टिस डिपार्टमेंट आरोपपत्र सार्वजनिक करायचे की नाही यावर विचार करत आहे.

निज्जरच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत कॅनडा वाट पाहत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले की, 'असे मानले जाते की आरोपपत्रातील व्यक्ती अमेरिकेतून (America) निघून गेली आहे.'

Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannu
Gangster Harpreet Singh Uppal Murder: गँगस्टर हरप्रीत सिंग उप्पलची कॅनडात हत्या; पोलिसांनी जारी केले CCTV फुटेज

एफबीआयने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला

रिपोर्टनुसार, यूएस जस्टिस डिपार्टमेंट आणि एफबीआयने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या वतीने असे सांगण्यात आले की, अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांशी चालू असलेल्या कायदेशीर बाबींवर किंवा खाजगी राजनैतिक चर्चेवर भाष्य करत नाही.

मात्र, अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे निश्चितपणे सांगण्यात आले. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी सुमारे 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा पुनर्संचयित केली आहे.

Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannu
Video: Gurpatwant Singh Pannun कडून एअर इंडियाचे विमान उडवण्याची धमकी

कॅनडियन पंतप्रधानांच्या आरोपांमुळे तणाव निर्माण झाला होता

खलिस्तानी निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांमुळे भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. भारताने ट्रुडो यांचे आरोप मूर्खपणाचे ठरवून फेटाळले होते.

काही दिवसांनंतर, भारताने (India) जाहीर केले की, ते कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करत आहे. तसेच, भारताने कॅनडाला आपल्या राजनयिकांची संख्या कमी करण्यास सांगितले होते.

एवढ्यावरच न थांबता भारताने कॅनडाला आपल्या भूमीतून कार्यरत दहशतवादी आणि भारतविरोधी तत्वांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की, भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com