US Army Helicopters Crash: अलास्कामध्ये ट्रेनिंगदरम्यान मोठी दुर्घटना, अमेरिकन लष्कराची दोन हेलिकॉप्टर कोसळली!

US Army Helicopters Crash: अलास्का येथे ट्रेनिंग आटोपून परतत असताना अमेरिकन लष्कराची दोन हेलिकॉप्टर कोसळली.
US Army Helicopters Crash
US Army Helicopters CrashDainik Gomantak

US Army Helicopters Crash: अलास्का येथे ट्रेनिंग आटोपून परतत असताना अमेरिकन लष्कराची दोन हेलिकॉप्टर कोसळली. या वर्षात अमेरिकेत लष्करी हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

यूएस आर्मी अलास्काचे प्रवक्ते जॉन पेनेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter) दोन लोक होते. असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पेनेलने सांगितले की, या घटनेबाबत ते शेअर करु शकतील अशी कोणतीही माहिती त्यांच्याकडे अद्याप उपलब्ध नाही.

US Army Helicopters Crash
Indonesian Boat Sinks: 78 जणांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रात उलटली; इंडोनेशियातील घटना

अमेरिकन लष्कराच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. जसजशी माहिती उपलब्ध होईल तसतशी ती सर्वांसमोर ठेवली जाईल. दुसरीकडे, अलास्का (Alaska) स्टेट ट्रूपर्सचे प्रवक्ते ऑस्टिन मॅकडॅनियल यांनीही या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

US Army Helicopters Crash
America: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या, पदव्युत्तर पदवी मिळणार होती; हल्लेखोराने...

फेब्रुवारीमध्ये हेलिकॉप्टरलाही अपघात झाला होता.

अलास्का स्टेट ट्रूपर्सचे प्रवक्ते ऑस्टिन मॅकडॅनियल यांच्या मते, या वर्षी फेब्रुवारीमध्ये एक अपाचे हेलिकॉप्टर अपघाताचा बळी ठरले होते, ज्यात दोन सैनिक जखमी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com