Indonesian Boat Sinks: 78 जणांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रात उलटली; इंडोनेशियातील घटना

58 जणांना वाचवण्यात यश
File Photo
File Photo Dainik Gomantak
Published on
Updated on

Boat Sinks in Indonesia: इंडोनेशियातील समुद्रात एक मोठी स्पीडबोट बुडाली आहे. यात सुमारे 78 प्रवासी होते. दरम्यान, या घटनेनंतर तातडीने बचावकार्यास सुरवात झाली आहे. स्थानिक लोकांचाही बचावकार्यात सहभाग आहे.

पश्चिम इंडोनेशियातील बेट समूहांजवळ शुक्रवारी (२८ एप्रिल) पहाटे ही घटना घडली. स्पीडबोट बुडताना लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. अपघातानंतर पेकनबारू शोध आणि बचाव संस्थेच्या स्वयंसेवकांनी बचावकार्य सुरू केले.

File Photo
King Charles III Coronation Ceremony: 1000 कोटींचा खर्च, 2.5 किलो सोन्याचा मुकुट... जनताच करणार ब्रिटनच्या राजाचा राज्याभिषेक

एजन्सीचे प्रमुख न्योमन सिद्धकार्य यांच्या माहितीनुसार 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, अपघातात बहुतेक महिला आणि लहान मुले आहेत. या बोटीतील 58 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर काहींचा शोध सुरू आहे.

रियाझ बेटांमधील तनजुंग पिनांग शहराकडे ही स्पीडबोट जात होती. या शेजारील प्रांतात 198 किलोमीटर (123 मैल) दूर असलेल्या टेंबिलाहान बंदरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच ही बोट उलटली. अपघाताच्या कारणाचा तपास केला जात आहे. इंडोनेशिया, सुमारे 17,000 बेटांचा द्वीपसमूह आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com