Israel-Hamas War: हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई; दहशतवादी संघटनेच्या 10 सदस्यांवर बंदी, आर्थिक नेटवर्कवरही प्रहार

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील दहा दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील दहा दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, अमेरिकेने हमासच्या 10 सदस्यांवर आणि आर्थिक नेटवर्कच्या एका गटावर निर्बंध लादले आहेत.

गाझा, सुदान, तुर्की, अल्जेरिया आणि कतारमध्ये पसरलेल्या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेच्या आर्थिक नेटवर्कच्या गटावर अमेरिकेने बुधवारी हे निर्बंध लादले.

यामध्ये गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणारे सदस्य, इराण सरकारशी घनिष्ठ संबंध असलेले कतारस्थित फायनान्सर, हमासचे प्रमुख कमांडर आणि गाझास्थित वर्च्युअस करन्सी एक्सचेंज यांचा समावेश आहे.

हमासने (Hamas) इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यात 1,000 हून अधिक लोक मारले गेले किंवा ओलीस ठेवले गेले.

दरम्यान, अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या विदेशी मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने आज या निर्बंधांची घोषणा केली. ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी सांगितले की, इस्त्रायली मुलांसह नागरिकांच्या क्रूर हत्याकांडानंतर अमेरिका हमासचे वित्तपुरवठादार आणि गुंतवणूकदारांना लक्ष्य करत आहे.

या पार्श्वभूमीवर ही जलद आणि निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटचा दहशतवादासाठी (Terrorism) होणारा वित्तपुरवठा नष्ट करण्याचा मोठा इतिहास आहे. हमासच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.

Joe Biden
Israel Hamas War: इस्रायलने बॉम्ब हल्ले थांबवल्यास सर्व ओलिसांची सुटका करण्यास तयार, हमासचा प्रस्ताव

अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत राहील: राष्ट्राध्यक्ष बायडन

इस्रायलला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन मंगळवारी रात्री उशिरा पश्चिम आशियाला पोहोचले. इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढलेल्या युद्धात तणाव कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

परंतु गाझा येथील रुग्णालयात झालेल्या भीषण स्फोटात सुमारे 500 लोकांचा मृत्यू झाल्याने या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन बुधवारीच इस्रायलला पोहोचले.

यावेळी ते म्हणाले की, अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत राहील. यावर मी चर्चा करण्यास उत्सुक आहे. बायडन पुढे म्हणाले की, इस्रायली लोकांचे धैर्य, वचनबद्धता आणि शौर्य थक्क करणारे आहे. मला इथे आल्याचा अभिमान आहे.

Joe Biden
Israel Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा टॉप कमांडर ठार, मध्य गाझामध्ये लपला होता कुख्यात दहशतवादी!

दुसर्‍या टीमने गाझामधील हॉस्पिटलवर हल्ला केला असावा: बायडन

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी काल रात्री गाझा येथील रुग्णालयात झालेल्या स्फोटाचाही उल्लेख केला.

ते म्हणाले की, हे दुसऱ्या टीमने केल्याचे दिसून येते. या घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे. या संघर्षात अमेरिका कुठे उभे आहे हे दाखवण्यासाठी आपण इस्रायलला भेट दिल्याचे बायडन यांनी आवर्जुन सांगितले.

बायडन पुढे म्हणाले की, हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्याचे प्रतिक हा हल्ला आहे. हमासने 31 अमेरिकन नागरिकांसह 1,300 लोक मारले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.'

शेवटी बायडन म्हणाले की, आम्ही मुलांसह इस्रायली ओलिसांचा देखील विचार करतो. हमासची दहशत पाहून लपलेली ती मुलं काय विचार करत असतील, ते माझ्या समजण्यापलीकडे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com