California: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला घराबाहेर बेल वाजवून खोड्या काढणाऱ्या तीन मुलांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
रिव्हरसाइड काउंटीचे रहिवासी अनुराग चंद्र यांना शनिवारी हत्येचा प्रयत्न आणि फर्स्ट-डिग्री हत्येच्या तीन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले.
दरम्यान, ही घटना 19 जानेवारी 2020 रोजी घडली, जेव्हा काही मुले अनुराग चंद्रा यांच्या घराची बेल वाजवत होती. त्यावेळी, अनुराग दारु पिऊन घरात बसले होते. मुलांच्या या चेष्टेमुळे ते हैराण झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची आपल्याला काळजी वाटत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दुसरीकडे, पहिल्यांदा त्यांनी मुलांचा पाठलाग केला. त्याचदरम्यान मुलांच्या गाडीला धडक बसली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका संशयिताने साक्ष दिली की, त्या व्यक्तीने मुलांच्या कारला (Car) धडकण्याचा विचार केला नव्हता.
कार चालक फक्त 18 वर्षांचा होता, जो दोन 13 वर्षांच्या मुलांसह गाडीत प्रवास करत होता. 2020 मध्ये झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी चंद्रा यांच्यावर आधीच आरोप आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.