Aadhaar-PAN Link : आधार-पॅन 31 मार्चपूर्वी लिंक करा : मुख्यमंत्री सावंत

नागरिकांकडून अतिरिक्त पैसे आकारणे गुन्हा; विविध ठिकाणी गर्दी
CM Sawant On Aadhaar-PAN link
CM Sawant On Aadhaar-PAN link Dainik Gomantak
Published on
Updated on

Link Aadhaar-PAN Before 31 March: केंद्रीय अर्थ खात्याच्या निर्देशानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे 31 मार्च 2023 पूर्वी अनिवार्य आहे.

यासाठी आता 1 हजार रुपयांच्या दंडासह मुदतीपूर्वी आधार-पॅन लिंक करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियाद्वारे केले. यासाठी कोणी अतिरिक्त पैसे आकारत असेल तर तो गुन्हा आहे, अशी तंबी त्यांनी आस्थापनांना दिली.

सध्या आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी राज्यभरातील सायबर केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. 31 मार्चपूर्वी आधार-पॅन कार्ड लिंक न केल्यास त्यापुढे 10 हजार रुपये दंड भरावा लागणार, या भीतीनेच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

(Goa CM Advises Aadhaar-PAN link Before March 31 Deadline)

CM Sawant On Aadhaar-PAN link
Vishwajit Rane : आयडी रुग्णालयाचे डॉ. डिसोझा निलंबित

सध्या भरावा लागणारा 1 हजार रुपयांचा दंडही परवडत नाही, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून येत आहेत. यासंबंधीचा दंड कमी करावा आणि मुदत ही वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले, की 31 मार्चपूर्वी कर सल्लागार, सीए, सिटीजन सर्व्हिस सेंटर यांच्या मदतीने पॅन-आधार लिंक करावे. यासाठी कोणी अतिरिक्त पैसे आकारत असेल तर तो गुन्हा आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

CM Sawant On Aadhaar-PAN link
G20 Summit: आगामी G20 शिखर परिषदेसाठी दाबोळी विमानतळावर अधिकाऱ्यांनी केली पाहणी

...अन्यथा 31 मार्चनंतर अधिकचा दंड

"केंद्र सरकारने 2021 मध्ये जाहीर केलेप्रमाणे 31 मार्च 2022 पूर्वी आधार कार्ड पॅनकार्डसोबत लिंक करणे अनिवार्य होते. मात्र, ज्या नागरिकांनी आधार-पॅन लिंक केलेले नाही, त्यांनी १ हजार रुपयांच्या दंडासह 31 मार्च 2023 पर्यंत ते लिंक करावे."

"अन्यथा, अधिकचा दंड होण्याची शक्यता आहे. एखादे आस्थापन अतिरिक्त रक्कम घेत असल्यास नागरिकांनी त्याची तक्रार करावी. संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com