नवी दिल्ली: Russia Ukraine War: युक्रेन रशिया संघर्ष पेटला असून युक्रेनवर रशियन सैन्याचे हल्ले सुरूच आहेत. दरम्यान दोन्ही देशात शांतता नांदावी यासाठी दोन्ही पक्षांमध्ये देशांत चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र रशियाकडून कोणतीही माघार घेण्याचे संकेत नाहीत. दरम्यान, रशियाचे संरक्षण मंत्र्यांनी यावर मोठे भाष्य केले असून यामुळे हे युद्ध भडकण्याची शक्यता आहे. रशियन संरक्षण मंत्री लष्कराचे जनरल सेर्गेई शोएगु (Russian Minister of Defense is Army General Sergey Shoygu) यांनी जोपर्यंत युक्रेन झुकणार नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील असे म्हटले आहे. तसेच त्यांनी, आम्ही युक्रेनच्या नागरिकांवर हल्ला करत नसून तेथील लष्करावर हल्ला करत आहोत, असे म्हटले आहे. तर आमचे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत युक्रेनवर हल्ले हे सुरूच राहणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. (until Ukraine bow bow attack will continue says Russian defense minister)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी, खार्किव येथे रशिया आणि मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आम्ही त्याच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर सरकार त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात असल्याचेही ते म्हणाले. तर भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला हे भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी रशिया (Russia) आणि युक्रेनच्या (Ukraine) राजदूतांशी (Ambassadors) चर्चा करत आहेत. अजूनही काही विद्यार्थी खार्किव आणि इतर संघर्षमय क्षेत्रांमध्ये अडकले आहेत. "रशिया आणि युक्रेनमधील आमचे राजदूतही अशाच प्रकारची चर्चा करत आहेत, असेही बागची म्हणाले. रशियाने मंगळवारी युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किव येथे गोळीबार केला आणि तेथील विविध ठिकानांचे नुकसान केले.
तसेच रशियन सैन्याने मंगळवारी युक्रेनची राजधानी किवला वेढा घातल नागरिकांना तातडीने शहर सोडण्यास सांगितले होते. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह (Defense Ministry spokesman Igor Konashenkov) यांनी, शहरातील सर्व नागरिक कीव-वासिल्किव महामार्गाने युक्रेनची राजधानी सोडू शकतात. तो मार्ग मोकळा आणि सुरक्षित आहे, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.