युक्रेनमध्ये (Ukraine) रशियाकडून हवेतील ऑक्सिजनची मात्रा कमी करण्यासाठी प्राणघातक बॉम्बचा वापर करण्यात आला आहे. युक्रेनमधील रशियन हल्ल्याचे निरीक्षण करणाऱ्या मानवाधिकार गटांनी आणि युक्रेनच्या अमेरिकेतील (America) राजदूतांनी सोमवारी यासंबंधी आरोप केला आहे. (Russia Has Used Oxygen Absorbing Vacuum Bombs On Ukraine)
दरम्यान, रशियाने (Russia) युक्रेनमध्ये क्लस्टर बॉम्ब आणि व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय अशा घातक शस्त्रांच्या वापराच्या विरोधात आहे.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल (Amnesty International) आणि ह्युमन राइट्स वॉच (Human Rights) या दोन्ही संघटनांनी म्हटले की, रशियन सैन्याने बंदी घातलेल्या क्लस्टर युद्धसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, मानवाधिकार गटांच्या मतानुसार, रशियाने हे धोकादायक बॉम्ब ईशान्य युक्रेनमधील प्रीस्कूलवर डागण्यासाठी वापरले आहेत. (Russia Ukraine War News Updates)
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कारोवा यांनी अमेरिकन खासदारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, रशियाने थर्मोबॅरिक शस्त्राचा वापर केला आहे, ज्याला व्हॅक्यूम बॉम्ब देखील म्हटले जाते.
व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय?
जेव्हा व्हॅक्यूम बॉम्ब किंवा थर्मोबॅरिक शस्त्राचा स्फोट होतो तेव्हा ते आसपासच्या हवेतील ऑक्सिजन शोषून घेते. यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होऊन मोठा स्फोट होतो. त्यामुळे सामान्य स्फोटापेक्षा जास्त काळ या स्फोटाची तीव्रता राहते. मानवी शरीराचे वाफेत रुपांतर करण्याची क्षमताही या बॉम्बमध्ये आहे. मात्र आतापर्यंत युक्रेनियन संकटादरम्यान थर्मोबॅरिक शस्त्रे वापरल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही.
तसेच, CNN ने च्या वृत्तानुसार, आमच्या टीमने शनिवारी दुपारी युक्रेनियन सीमेवर रशियन थर्मोबॅरिक मल्टिपल रॉकेट लाँचर पाहिले होते.
शिवाय, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, आम्ही हे अहवाल पाहिले आहेत, परंतु रशियाने अशी शस्त्रे वापरली आहेत याची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.
जेन साकी पुढे म्हणाल्या, "जर हे खरं असेल तर मग युद्ध हा गुन्हा आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे प्रशासन या प्रकरणाची चौकशी करेल."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.