पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. युनिसेफचे कर्मचारी सुरक्षित नाहीत. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबादमधील एका सुरक्षा रक्षकावर युनिसेफच्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वीडिश नागरिक असलेल्या युनिसेफच्या महिला अधिकाऱ्याने इस्लामाबादमधील आबपारा भागातील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राहत्या घरी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (UNICEF official raped by a security guard in Islamabad Pakistan)
खरं तर, अहवालानुसार, युनिसेफचे (UNICEF) अधिकरी पाकिस्तानात बळी ठरत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, पीडित अधिकारी या वर्षी जानेवारी महिन्यात इस्लामाबादमध्ये (Islamabad) तैनात होती. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी गार्ड या मार्चपासून आपल्या घरी तैनात होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, गार्डने आपल्या राहत्या घरी बेडरुममध्ये घुसून बलात्कार केला.
दरम्यान, घटनेनंतर आरोपी फरार झाल्याचेही सांगण्यात आले आहे. एवढंच नाही तर आरोपीने आधी महिलेचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचेही सांगण्यात आले. फरार गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सध्या एक पथक तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले आहे.
तर दुसरीकडे, इस्लामाबादच्या कहूता भागात एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री आपली मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पहाटे पाच वाजता घरी परतल्याचे त्यांनी सांगितले. एका संशयिताने बांधकाम सुरु असलेल्या घरात तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.