पाकिस्तानचा बुरखा फाटला! लाल किल्ला हल्ल्यामागे 'जैश-ए-मोहम्मद'चा हात, UN च्या अहवालानं पाकड्यांचं पितळ उघडं

Delhi Blast : दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे.
Delhi Blast
Delhi BlastDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा थेट संबंध असल्याचे युएनच्या ३७ व्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालामुळे सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवाल काय सांगतो?

सुरक्षा परिषदेच्या १२६७ निर्बंध समितीने (Sanctions Committee) तयार केलेल्या या अहवालात 'अ‍ॅनालिटिकल सपोर्ट अँड सॅन्शन्स मॉनिटरिंग टीम'ने स्पष्ट केले आहे की, लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. या हल्ल्यात १५ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. पाकिस्तान वारंवार जैश आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटना निष्क्रिय झाल्याचा दावा करत असला, तरी युएनच्या या अहवालाने पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

Delhi Blast
Leopard In Goa: डिचोलीत बिबट्याची दहशत, भर लोकवस्तीत वावर; विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांच्या जीवाला धोका

अहवालातील माहितीनुसार, जैशचा म्होरक्या मसूद अजहर याने दहशतवादी कारवायांचा विस्तार करण्यासाठी 'जमात-उल-मुमिनात' नावाच्या महिला विंगची स्थापना केली आहे. ही विंग सध्या युएनच्या बंदी यादीत नसली तरी, दहशतवादी कारवायांना छुप्या पद्धतीने मदत करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही सदस्य देशांच्या मते जैश आता पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय झाली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान या संघटना अस्तित्वात नसल्याचे सांगून जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

Delhi Blast
Goa Matrimonial Fraud: मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार शोधणं पडलं महागात; 'लंडन'च्या भामट्याकडून चिंबलच्या महिलेला 'इतक्या' लाखांचा गंडा!

पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख

या अहवालात केवळ दिल्लीतील हल्ल्याचाच नाही, तर एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) ने केला होता, जी लष्कर-ए-तैयबाचीच एक 'प्रॉक्सी' संघटना मानली जाते. भारताने मे २०२५ मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचा संदर्भही या अहवालात देण्यात आला आहे, ज्यामुळे भारताच्या भूमिकेला जागतिक स्तरावर बळ मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com