Mpox in Congo: काँगोमध्ये प्रथमच लैंगिक संक्रमणातून मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार होत असल्याची पुष्टी जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. काँगोमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा सर्वात मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे.
विषाणूचा प्रसार रोखणे अधिक कठीण होऊ शकते असा इशारा आफ्रिकन शास्त्रज्ञांनी दिला आहे.
बेल्जियममधील एक रहिवासी मार्चमध्ये काँगोला गेला होता तो माघारी आला त्यावेळी त्याची मंकीपॉक्स चाचणी सकारात्मक आली होती, अशी माहिती यू.एन.च्या आरोग्य एजन्सीने गुरुवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.
दरम्यान, या व्यक्तीचे इतर पुरुषांशी लैंगिक संबंध असल्याचे समोर आले आहे. समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांच्या क्लबमध्ये देखील सहभागी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याच्याशी लैंगिक संपर्कात आलेले पाचजणाची मंकीपॉक्स चाचणी सकारात्मक आल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
'आफ्रिकेतील मंकीपॉक्सच्या लैंगिक संक्रमणाचा हा पहिला पुरावा आहे,' असे नायजेरियन विषाणूशास्त्रज्ञ ओयेवाले तोमोरी यांनी म्हटले आहे.
मागील दशकांपासून पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांत मंकीपॉक्स पाहायला मिळत असून, त्याचे उंदीरांपासून मानवांमध्ये संक्रमण होते.
गेल्या वर्षी, युरोपमधील समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांमधील लैंगिक संबंधांमुळे उद्भवलेल्या महामारीने 100 हून अधिक देशांमध्ये प्रभावित केले. WHO ने हा उद्रेक जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केला.
काँगोमध्ये अनेक क्लब असून पुरुष इतर पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात, हे लोक पुढे आफ्रिका आणि युरोपच्या इतर भागांमध्ये प्रवास करतात, असे डब्ल्यूएचओने नमूद केले आहे.
मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे काँगोमध्ये 12,500 हून अधिक लोक संक्रमित झाले असून, सुमारे 580 लोकांचा मृत्यू झाला आहे.
विषाणूचा धोका पत्करणे रोगाला आळा घालणे अधिक कठीण होईल असा इशारा विषाणूशास्त्रज्ञ ओयेवाले तोमोरी यांनी दिला आहे.
मंकीपॉक्समध्ये ताप, थंडी वाजून येणे, पुरळ आणि चेहऱ्यावर किंवा गुप्तांगावर जखम होतात. बहुतेक लोक रुग्णालयात दाखल न करता काही एक आठवड्यांत बरे होतात.
कॉंगोमध्ये हजारो प्रकरणे समोर आली असूनही, अद्याप कोणतीही लस आलेली नाही. पश्चिमेकडील मंकीपॉक्स महामारी कमी झाल्यानंतरही, आफ्रिकेसाठी काही शॉट्स उपलब्ध करून देण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.