रशिया-युक्रेन युद्ध एका भयानक वळणावर पोहोचले आहे. रशिया युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर सातत्याने हल्ले करत आहे. दोन्ही देशांचे सैन्य वेगवेगळ्या ठिकाणी आपापसात लढत असून ज्यामध्ये हजारो निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत आहे. काल रात्री युक्रेनमधील नागरिक गाढ झोपेत असताना रशियाने (Russia) युक्रेनच्या (Ukraine) इतर शहरांसह कीववर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी लोक रक्ताच्या थारोळ्यातून इकडे तिकडे धावत होते. (Ukrainian And Some International Observers Have Accused NATO Of Betraying Ukraine)
दरम्यान, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा (Dimitro Kuleba) यांनी सांगितले की, 'याआधी कीवमध्ये 1941 मध्ये दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने (Germany) हल्ला केला, तेव्हा अशी संकटमयी परिस्थिती पाहण्यात आली होती. तेव्हाही युक्रेनवर महायुध्दाचा घातक परिणाम झाला होता.'
तसेच, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) या धोकादायक संकटाच्या वेळी हताश दिसत आहेत. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करुन ते सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांना युद्धाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आवाहन करत आहेत. युक्रेन लढत राहील, हार मानणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले, 'शत्रूंनी मला त्यांचे पहिले लक्ष्य म्हणून निवडले आहे. तर दुसरे लक्ष्य माझे कुटुंब आहे.' त्यांनी 18-60 वर्षे वयोगटातील युक्रेनियन पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. प्रत्येकाने आपल्या देशाचे रक्षण करावे, ज्यांना या लढ्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांना सरकारकडून शस्त्रे दिली जातील.''
लष्कर आणि नागरिक लक्ष्य होतायेत
दुसर्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की, 'रशिया संपूर्ण युक्रेनवर हल्ले करुन लष्कर आणि नागरिकांना लक्ष्य करत आहे.' यावेळी त्यांनी नाटो (North Atlantic Treaty Organization), ईयू (European Union) आणि अमेरिकेकडून झालेल्या फसवणुकीचा उल्लेख केला. तीच अमेरिका गेली अनेक महिने युक्रेनला मदत केली जाईल, असे म्हणत होती. युक्रेनच्या सीमेवर लाखो रशियन सैनिक तैनात असल्याची माहिती यापूर्वी वारंवार युक्रेनकडून सांगण्यात येत होती. कोणत्याही दिवशी हल्ला रशियाकडून हल्ला होऊ शकतो, असेही युक्रेन सरकारकडून सांगण्यात येत होते. असे असूनही, युक्रेनचे रक्षण करण्यासाठी नागरिकांना आणि लष्करांना ते धीर देत होते. दुसरीकडे पाश्चिमात्य देश नुसते बोलत राहिले. युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले, तेव्हा कोणीच मदतीसाठी आले नाही.
नाटोने युक्रेनला फसवल्याचा आरोप
युक्रेनियन आणि काही आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी नाटोवर युक्रेनचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संकट अधिक गडद झाले. पाश्चिमात्य देश सध्या हतबल असून भ्याडपणे वागत आहेत. युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याऐवजी ते केवळ पाहत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.