Russia Vs Ukraine War: "जगातील सर्वात शक्तिशाली देश दूर बसून फक्त पाहतोय"

युक्रेनवरील (Ukraine) रशियन लष्करी हल्ला थांबवण्यासाठी रशियावरील निर्बंध पुरेसे नाहीत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
Ukraine President Volodymyr Zhelensky
Ukraine President Volodymyr ZhelenskyDainik Gomantak
Published on
Updated on

युक्रेनवरील रशियन लष्करी हल्ला थांबवण्यासाठी रशियावरील निर्बंध पुरेसे नाहीत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zhelensky) यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर रशियन युक्रेन युद्धात पाश्चात्य देशांनी आपल्याला एकटे सोडल्याचा आरोप देखील युक्रेनच्या (Ukraine) अध्यक्षांनी केला आहे. (Ukraine President Volodymyr Zhelensky Has Criticized The United States)

दरम्यान, कीवमध्ये रशियन हल्ल्यानंतर बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, जग अजूनही युक्रेनमधील घडामोडी दुरुन बसून पाहत आहे.

Ukraine President Volodymyr Zhelensky
Russia Vs Ukraine War: जगात पडली उभी फुट; दोन गटात भारत कुठे?

सीएनएनच्या मते, फेसबुक व्हिडिओमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, "कालप्रमाणे आज सकाळीही आपण एकटेच आपल्या देशाला वाचवत आहोत. जगातील सर्वात शक्तिशाली देश दुरुन पाहत आहेत." या वक्तव्यावरुन युक्रेनने अमेरिकेकडे (America) बोट दाखवले आहे.

"रशियावर काल निर्बंध लादण्यात आले, परंतु हे निर्बंध आमच्या मातीतून रशियन सैन्याला उखडून टाकण्यासाठी पुरेसे नाहीत," असेही ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, हे केवळ एकता आणि दृढनिश्चयानेच होऊ शकते.”

तसेच, ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा (Canada), युरोपियन युनियन तसेच अनेक देशांच्या नेत्यांनी युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध केला आहे. त्यांनी रशियावर कठोर निर्बंधही लादले आहेत.

Ukraine President Volodymyr Zhelensky
Russia-Ukraine War: युक्रेनमधील 70 हून अधिक लष्करी तळ नष्ट!

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिका रशियावर नवीन निर्बंध लादणार असून रशियाला जागतिक अर्थव्यवस्थेपासून दूर करण्याच्या प्रयत्नात आम्ही सामील आहोत. नव्या निर्बंधांचा अर्थ रशियाला यूएस मार्केटपासून दूर करणे आहे. तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक VTB बँकेसह चार प्रमुख रशियन बँकांची मालमत्ता जप्त करण्याचे देखील त्यात समाविष्ट आहे.

त्यानंतर युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष, चार्ल्स मायकल यांनी म्हटले, युरोपियन युनियनने रशियाला युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल शिक्षा देण्यासाठी आणखी निर्बंध लादले आहेत.

Ukraine President Volodymyr Zhelensky
Russia-Ukraine War: रशियाचा 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'; क्षणात विनाश घडवू शकतो

"आम्ही एक राजकीय निर्णय घेतला आहे की, आम्ही रशियावर आणखी निर्बंध लादणार आहोत. ज्यामुळे रशियन राजवटीला मोठा धक्का बसेल," असं मायकेल यांनी EU शिखर परिषदेनंतर सांगितले.

शिवाय, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वो डर लीन यांनी सांगितले की नवीन EU निर्बंधांमुळे रशियाच्या 70% बँकिंग क्षेत्रावर होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क या फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र देशाचा दर्जा दिला आहे. पुतिन यांनी नंतर "पूर्व युक्रेनमधील लोकांना वाचवण्यासाठी" आणि "युक्रेनियन सैन्याचा नाश करण्यासाठी" लष्करी मोहीम रशियाकडून सुरु करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com