Ukraine Attack: युक्रेनचा मोठा हल्ला! रशियाची 40 विमाने केली नष्ट; युद्धभूमीवर तणाव वाढला

Ukraine Russia War : युक्रेनने आतापर्यंत मॉस्कोपर्यंत अनेकवेळा ड्रोन हल्ले केले आहेत. मात्र, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व हल्ले फोल ठरविले.
Ukraine Attack
Ukraine Russia war X
Published on
Updated on

किव्ह: युक्रेनने आज रशियामध्ये खोलवर मारा करत ४० विमाने नष्ट केली. युक्रेनने केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यापूर्वी रशियानेही युक्रेनच्या लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे १२ सैनिक मारले गेले होते. दोन्ही देशांदरम्यान उद्या (ता. २) इस्तंबूल येथे थेट चर्चेची दुसरी फेरी होणार असताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर मात्र तणाव वाढला आहे.

युक्रेनने आतापर्यंत मॉस्कोपर्यंत अनेकवेळा ड्रोन हल्ले केले आहेत. मात्र, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व हल्ले फोल ठरविले. त्यामुळे युक्रेनने यावेळी वेगळी चाल रचताना बंद ट्रकमधून अनेक ड्रोन रशियाच्या आतील प्रदेशांपर्यंत पोहोचविले. नंतर या ड्रोनच्या साह्याने आज दुपारी विविध हवाई तळांवर हल्ला करत ४० बाँबर विमाने नष्ट करण्यात आली. इरकुत्स्क भागात हा हल्ला झाल्याची माहिती प्रशासन यंत्रणेने दिली.

युक्रेनच्या सीमेपासून चार हजार किलोमीटर आतपर्यंत हे हल्ले झाल्याने रशियाला धक्का बसला आहे. ट्रकमधून हे ड्रोन उडविण्यात आल्याने हवाई संरक्षण यंत्रणेला त्यांचा माग लागला नाही, असे युक्रेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, आजच्या हल्ल्याची तयारी मागील दीड वर्षांपासून सुरू होती.

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की स्वत: या योजनेवर लक्ष ठेवून होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. युक्रेनने एकाच वेळी चार रशियन लष्करी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात नष्ट करण्यात आलेल्या विमानांमध्ये टीयू-९५, टीयू-२२एम ३ या विमानांसह एका ए-५० विमानाचा समावेश आहे.

Ukraine Attack
Russia Ukraine War: रशियामध्ये भारतीयांची फसवणूक; सैन्यात जबरदस्तीने भरती केलेल्या पंजाबमधील 7 तरुणांनी मागितली मदत

प्रशिक्षण तळांवर हल्ले

दरम्यान, या हल्ल्यापूर्वी रशियाने युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे १२ सैनिक ठार झाले, तर ६० जण जखमी झाले. हा प्रशिक्षण तळ रशियाच्या ड्रोनच्या टप्प्यात आहे. युक्रेनच्या सैन्यदलाला मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागत असून, सतत रशियन ड्रोन गस्त घालत असल्याने सैनिक मोठ्या प्रमाणावर एकत्र न येण्याची काळजी घेतली जात आहे. युक्रेनच्या कुर्स्क भागात सध्या रशिया आणि युक्रेनच्या सैन्यांमध्ये धुमश्‍चक्री सुरु आहे.

Ukraine Attack
India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

‘रशियाने प्रस्ताव द्यावा’

रशियाने सोमवारी इस्तंबूलमध्ये नवीन चर्चा फेरीचा प्रस्ताव समोर ठेवला होता. त्याला युक्रेनने प्रतिसाद दिला असून संरक्षण मंत्री रुस्तम उमेरोव्ह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सोमवारी रशियासोबत चर्चा करण्यासाठी इस्तंबूलमध्ये उपस्थित राहतील, असे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले. रशियाने आधीच्या बैठकीत मान्य केल्यानुसार युद्ध थांबविण्यासाठीचा प्रस्ताव ठेवावा, असे आवाहनही झेलेन्स्की यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com