Ukraine Air Strikes: रशियाच्या मिलिटरी कंपाऊंडवर युक्रेनचा हवाई हल्ला, Video व्हायरल

Ukraine: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असेलेलं युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही. यातच आता, युक्रेनने रशियाच्या ताब्यातील माकिव्का शहरावर हवाई हल्ला केला.
Ukraine Air Strikes Video
Ukraine Air Strikes VideoDainik Gomantak

Ukraine Air Strikes: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असेलेलं युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही. यातच आता, युक्रेनने रशियाच्या ताब्यातील माकिव्का शहरावर हवाई हल्ला केला. रात्रीच्या हल्ल्यात युक्रेनच्या लष्कराने अमेरिकेकडून मिळवलेल्या हिमरास रॉकेटचा (HIMRAS) वापर केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

युक्रेनच्या लष्कराने दोन रॉकेट ऑइल डेपोवर डागली. रॉकटे डागल्याने पहिला स्फोट छोटा होता. त्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता वाढत गेली. यातच, शस्त्रसाठ्याला मोठी आग लागली. काही वेळाने दुसरा मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर हवेत आगीचे लोळ दिसून आले.

दरम्यान, शॉकवेव खूप दूरपर्यंत जाताना दिसत होती. आजूबाजूच्या परिसरातील दिवे गेले. यानंतर बराच वेळ स्फोटाच्या ठिकाणी छोटे छोटे स्फोट होत राहिले. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून रशियाने पश्चिम युक्रेनमधील (Ukraine) लवीव शहरावर क्षेपणास्त्र डागले. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Ukraine Air Strikes Video
Russia Ukraine War: युक्रेनचे लष्करप्रमुख जालुझनी देशातून फरार? पुतिन यांच्या दाव्याने खळबळ

यापूर्वी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले होते की, 'अमेरिका आम्हाला मदत करत आहे, याचा मला खूप आनंद आहे. या मदतीमुळे आम्ही रशियाविरुद्ध (Russia) कठोर कारवाई करु शकतो. पण त्यासाठी शस्त्रे हवीत. उशीर झाला तर हल्लेही कमी होतील. याचाच फायदा रशियाला होईल. आमचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही.'

याआधीच, अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल मार्क ए मायली म्हणाले होते की, 'युक्रेनचे सैन्य रणनीतीने पुढे जात आहे. मात्र, युक्रेनला रशियाच्या ताब्यातील क्षेत्रे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वेळ लागत आहे.

यामध्ये विलंब झाल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. जितके जास्त काळ युद्ध पुढे जाईल तितके जास्त जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होईल.'

Ukraine Air Strikes Video
Ukraine Dam Collapsed: धरण फुटल्यानंतर सर्वत्र विध्वंसक दृश्य, स्फोटाचा भितीदायक व्हिडिओ समोर

जनरल मायले पुढे म्हणाले की, 'युक्रेनचे सैन्य भूसुरुंग आणि गनिमी काव्याच्या माध्यमातून रशियन सैनिकांवर हल्ले करत आहेत. जीवाची पर्वा न करता ते रशियन सैनिकांशी समोरासमोर लढत आहेत. ते विजयी होतील पण त्याला बराच वेळ लागेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com