Ukraine Dam Collapsed: धरण फुटल्यानंतर सर्वत्र विध्वंसक दृश्य, स्फोटाचा भितीदायक व्हिडिओ समोर

Russia Ukraine News: युक्रेनच्या खेरसन भागात असलेल्या नोव्हा काखोव्का धरणात झालेल्या स्फोटानंतर देशात दहशतीचे वातावरण आहे. धरण फुटल्याने युक्रेनमध्ये विध्वंसक दृष्य आहे.
Ukraine Dam
Ukraine DamDainik Gomantak
Published on
Updated on

Ukraine-Russia War: रशियाने मंगळवारी पहाटे देशातील नोव्हा काखोव्का धरणाचा स्फोट केल्याचा दावा युक्रेनने  केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. बंधारा फुटल्यानंतर परिसरात पाणी वाढतच होते.

या धरणाजवळील 80 गावे पूर्णपणे वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या घटनेला दहशतवादी कृत्य म्हटले आहे. पुरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

नीपर नदीवर बांधलेले हे धरण फुटल्यामुळे 4.8 अब्ज गॅलन पाणी खेरसन शहराकडे वळले आहे. ऑक्‍टोबर 2022 मध्ये झेलेन्स्की यांनीही रशिया धरणाचा स्फोट करू शकते अशी भीती व्यक्त केली होती.

सेकंदात विनाश

या धरणाच्या स्फोटाचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये काही सेकंदात युक्रेनमध्ये कसा प्रलय घडला हे पाहता येईल. धरणाजवळ असलेल्या 80 गावांमध्ये पूरस्थिती आहे. दर तासाला आठ इंच पाणी वाढत आहे.

युक्रेन पूरग्रस्त भागातून सुमारे 17,000 लोकांना बाहेर काढण्याची तयारी करत आहे. याशिवाय धरणाचा विध्वंस हा युद्धगुन्हा म्हणून वर्गीकरण करण्याचाही त्यांचा विचार आहे.

धरणात झालेल्या स्फोटामुळे काही जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. तर काही लोक यामध्ये अडकले आहेत. या भागातील आपत्ती अभूतपूर्व असल्याचे म्हटले जात आहे. बचाव कर्मचार्‍यांना घरांमध्ये जाण्यासाठी बोटींचा वापर करावा लागत आहे.

Ukraine Dam
Econnomic Crisis in Pakistan : कंगाल पाकिस्तानमध्ये रात्री 8 वाजता दुकाने बंद! पैसे वाचवण्यासाठी शाहबाज सरकारचा तुघलकी आदेश

रशियाकडून गोळीबाराची भीती

नीपर नदीच्या पश्चिम किनार्‍यावर काम करणार्‍या बचावकर्त्याने सांगितले की पाणी कधी थांबेल हे कोणालाच माहिती नाही. ते म्हणाले की पाण्याचा प्रवाह शोधणे देखील खूप कठीण आहे.

लोकांना अचानक घरे सोडावी लागत आहेत. आपले सामान आणि पाळीव प्राणी गोळा करत असताना हे लोक अजूनही बिकट अवस्थेत आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांना स्वयंसेवकांकडून मदत केली जात आहे.

Ukraine Dam
PM Modi अमेरिकेत रचणार इतिहास; अशी कामगिरी करणारे ठरणार पहिले भारतीय पंतप्रधान

हजारो निर्वासितांना ओडेसा आणि मायकोलायव येथे नेण्यासाठी ट्रेन आणि बसचा वापर केला जात आहे. बचावकार्य सुरू असताना रशियाकडून पुन्हा गोळीबार सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com