Ukraine चे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की होतायेत ट्रोल, फोटोशूट करणं पडलं महागात

Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना त्यांच्या एका फोटोशूटमुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे.
Ukraine President Volodymyr Zelenskyy
Ukraine President Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
Published on
Updated on

Ukraine President Volodymyr Zelenskyy: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना त्यांच्या एका फोटोशूटमुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे. एका मासिकासाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये युद्धग्रस्त देशाचे राष्ट्रपती आपल्या पत्नीसोबत पोज देताना दिसत आहेत. झेलेन्स्की यांचे हे फोटो समोर आल्यानंतर लोक त्यांना प्रचंड ट्रोल करत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घोषित केलेल्या युद्धामुळे युक्रेन गंभीर संकटाचा सामना करत आहे. 24 फेब्रुवारी रोजी पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी हल्ल्याचे आदेश दिले. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित झाले आहेत.

तथापि, युद्धग्रस्त युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष झेलेन्स्की युद्धादरम्यान प्रत्येक आघाडीवर पुढे दिसले. ते लष्करासोबत आघाडीवरही दिसत होते. रशियापेक्षा (Russia) खूपच लहान देशाचा नेता म्हणून, झेलेन्स्की यांनी इतर देशांकडून प्रशंसाही मिळवली. मात्र, चार महिन्यांच्या संघर्षानंतर झेलेन्स्की यांना आता ऑनलाइन ट्रोल केले जात आहे. त्याचे कारण, वोग मॅगझिनसाठी केलेले फोटोशूट. ते व्होग मासिकाच्या डिजिटल कव्हरसाठी पत्नी आणि फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्कासोबत पोज देताना दिसत आहेत. फोटो ऑनलाइन व्हायरल झाले आहेत.

Ukraine President Volodymyr Zelenskyy
Ukraine War: रशियन पत्रकाराला दंड, लष्करावर टीका केल्याचा आरोप

दरम्यान, फोटोमध्ये झेलेन्स्की आपल्या पत्नीबरोबर खुर्चीत बसलेले दिसून येत आहेत. इतर फोटोमध्ये ते आपल्या पत्नीला मिठी मारताना दिसत आहेत. यासोबतच त्यांनी बंकरनुमा पॅलेसमध्ये क्लिक केलेला फोटोही मिळाला आहे. याशिवाय ओलेना यांनी युक्रेनमधील युद्धाची परिस्थिती ठळकपणे मांडण्यासाठी टँकर आणि सैनिकांजवळचे फोटोही क्लिक केले आहेत.

दुसरीकडे मात्र, या फोटोशूटवरुन झेलेन्स्की यांना ट्रोल ऑनलाइन (Online) ट्रोल केले जात आहे. एका यूजर्सने लिहिले, "मला विश्वासच बसत नाही की, रशिया त्यांच्या देशावर बॉम्बफेक करत असताना झेलेन्स्की व्होगसाठी फोटोशूट करत आहे. हे खूप मूर्खपणाचे आहे."

Ukraine President Volodymyr Zelenskyy
Russia Ukraine War: रशिया 9 मेनंतर युद्ध संपण्याची घोषणा करणार?

आणखी एका यूजरने कमेंट केली की, 'देश युद्धाच्या टप्प्यातून जात आहे. झेलेन्स्की असा विचार करत असतील की, कदाचित माझ्या पत्नीसोबत व्होग फोटोशूट काही मदत करेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com