Russia Ukraine War: रशिया 9 मेनंतर युद्ध संपण्याची घोषणा करणार?

Russia Ukraine Crisis: रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले, रशिया विजय दिवसापर्यंत युद्धांच्या रणनितीमध्ये कोणताही बदल करणार नाही.
Russia Ukraine War: रशिया 9 मेनंतर युद्ध संपण्याची घोषणा करणार?
Dainik Gomantak
Published on
Updated on

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 68 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र दोन्ही देशातील संघर्ष अद्याप संपले नाही. युद्धा थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात असून अशातच युद्ध थांबण्यावर रशियाची भूमिका समोर आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले, रशिया (Russia) विजय दिवसापर्यंत युद्धांच्या रणनितीमध्ये कोणताही बदल करणार नाही. 9 मे हा दिवस रशिया विजय दिवस मानला जात असून याच दिवशी रशियाने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव केला होता. त्यामुळे 9 मेपर्यंत युक्रेन-रशिया युद्ध सुरुच राहणार आहे. (Russia Ukraine War latest News)

रशिया युक्रेनसोबतचे युद्ध 9 मे रोजी संपवणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. पण युद्ध सुरु झाल्यापासून 68 दिवसा पूर्ण झाले असून अद्याप रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. युक्रेनमधील बहुतेक शहरांवर रशियाला अद्याप ताबा मिळवता आलेला नाही. 24 फेब्रुवारी रोजी जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर दावा केला होता की, केवळ ते सहा दिवसात रशिया युक्रेनचा पराभव करुन ताबा मिळवेल. पण, युक्रेनने युद्धात रशियाविरोधात खडतर प्रतिउत्तर देताना दिसत आहे. अद्याप युक्रेनच्या (Ukraine) सैन्याने रशियाविरोधात हत्यार टाकलेली नाहीत. दुसरीकडे या युद्धामुळे रशियाला जागतिक पातळीवर फार नुकासान सहन करावे लागत आहे. तसेच युद्धामुळे पुतिन यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. परिणामी पुतिन युद्ध संपवण्याच्या विचारात असून लवकरच युद्धबंदीची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Russia Ukraine War: रशिया 9 मेनंतर युद्ध संपण्याची घोषणा करणार?
अमेरिकेतील शिकागोमध्ये गोळीबार; 8 जणांनी गमावला जीव

* 9 मे 'रशिया विजय दिन'
रशिया दरवर्षी 9 मे हा दिवस 'विजय दिन' म्हणून साजरा करतो. याचे कारण म्हणजे 9 मे रोजीच रशियाने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव केला होता. सध्या माध्यमांमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. 9 मे रोजी रशिया युद्धावर विराम जाहिर करु शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com