Ukraine Drone Attack: युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! तेल डेपोला भीषण आग; दोन्ही देशांतील संघर्ष आणखी तीव्र

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला. युक्रेनने रशियाच्या तेल डेपोवर (Oil Depot) जोरदार हल्ला केला.
Ukraine Drone Attack
Ukraine Drone AttackDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला. युक्रेनने रशियाच्या तेल डेपोवर (Oil Depot) जोरदार हल्ला केला, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (3 ऑगस्ट) रात्री 'ब्लॅक सी'च्या किनाऱ्यावरील सोची (Sochi) शहरालगत असलेल्या एका तेल डेपोवर युक्रेनी ड्रोन हल्ल्यामुळे (Drone Attack) भीषण आग लागली.

ड्रोन हल्ल्यानंतर आग

क्रास्नोदर प्रदेशाचे गव्हर्नर वेनियामिन कोंद्रात्येव्ह यांनी सांगितले की, एका ड्रोनला पाडण्यात यश आले, पण त्याचा मलबा (Debris) एका इंधन टँकवर पडल्याने आग भडकली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 120 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या (Firefighters) घटनास्थळी पाठवण्यात आल्या. या घटनेनंतर सोची विमानतळावरील (Sochi Airport) उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली. सोशल मीडियावर (Social Media) या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात धुराचे मोठे लोट दिसत आहेत.

Ukraine Drone Attack
Pakistan Drone Attacks: पाकिस्तानची भेकड खेळी! 400 ड्रोन हल्ले लष्कराने परतवले; नागरी विमानांची पाककडून ढाल

हल्ले-प्रतिहल्ले सुरूच

दरम्यान, या हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरु झाले आहेत.

  • रशिया: रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत त्यांनी रशिया आणि 'ब्लॅक सी'च्या परिसरात 93 युक्रेनी ड्रोन पाडले.

  • युक्रेन: युक्रेनच्या मायकोलाईव्ह शहरावर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात (Missile Attack) सात लोक जखमी झाले. युक्रेनच्या हवाई दलाने (Air Force) सांगितले की, रशियाने 76 ड्रोन आणि 7 क्षेपणास्त्रे डागली, ज्यापैकी 60 ड्रोन आणि 1 क्षेपणास्त्र पाडण्यात यश आले. मात्र, 16 ड्रोन आणि 6 क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यांपर्यंत पोहोचली.

Ukraine Drone Attack
Pakistan Drone Attack: बिथरलेल्या पाकिस्तानचा जम्मूसह पठाणकोट एअरबेसवर ड्रोन हल्ला, नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना; वीजपुरवठा खंडित

शांती प्रयत्नांना धक्का

दरम्यान, हे हल्ले अशा वेळी होत आहेत, जेव्हा युक्रेनमध्ये गेल्या काही महिन्यांतील सर्वात जास्त जीवितहानी झाली आहे. गुरुवारी झालेल्या रशियन हल्ल्यात 31 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात 5 मुलांचा समावेश होता. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला.

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना 8 ऑगस्टपर्यंत शांतता प्रक्रियेत सहभागी होण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ट्रम्प यांनी वॉर्निंग दिली की, जर शांततेकडे पावले उचलली नाहीत, तर रशियावर नवे आर्थिक निर्बंध (Economic Sanctions) लादले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
IRGC Claims Capturing US Underwater Drone
America Strikes Iranian Oil Tankers:
Women Rone Training Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com