Rishi Sunak: नारायण मूर्तींचा जावई होणार ब्रिटनचा PM?

Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Rishi Sunak
Rishi Sunak Dainik Gomantak
Published on
Updated on

Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर केवळ 44 दिवसांनी त्यांनी हे पद सोडले. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्याच पक्षाचे खासदार ऋषी सुनक हे पंतप्रधान होण्याची शक्यता बळावली आहे. असे झाल्यास भारतीय वंशाचा ब्रिटनचा पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

कोण आहेत ऋषी सुनक?

हॅम्पशायर, यूके येथे जन्मलेल्या ऋषी सुनक यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून (Oxford University) उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी गोल्डमन सॅक्समधून करिअरला सुरुवात केली. यानंतर ते राजकारणात आले. 2015 मध्ये पहिल्यांदा रिचमंड, यॉर्कशायर येथून ते खासदार झाले. त्यानंतर ऋषी सुनक लगातार तेथून खासदार म्हणून निवडून आले. गेल्या वर्षी सुनक हे रिचमंड मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते.

Rishi Sunak
Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

नारायण मूर्ती यांचे जावई

ब्रिटनचे (Britain) अर्थमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याबरोबरच त्यांनी बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या निवडणूक प्रचारातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऋषी सुनक हे भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. 2009 मध्ये नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीसोबत त्यांचा विवाह झाला.

Rishi Sunak
New Prime Minister Liz Truss यांचा पगार किती? 'या' आव्हानांचा करावा लागणार सामना

सुनक लिझ ट्रसकडून पराभूत झाले

विशेष म्हणजे, ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनक हेही लिझ ट्रस यांच्यासोबत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. पण टोरी नेतृत्वाच्या लढाईत ते लिझ ट्रस यांच्याकडून पराभूत झाले. ट्रस यांना 81,326 मते म्हणजे 57 टक्के मते मिळाली, तर सुनक यांना 60,399 मते मिळाली होती. मात्र 44 दिवसांनंतर लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक यांचे नाव चर्चेत आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com