Points of Light' Award: भारतीय वंशाच्या सात वर्षीय मुलीला ‘पॉइंट्स ऑफ लाइट’ पुरस्कार, ब्रिटिश उपपंतप्रधानांनी केला गौरव

भारतीय वंशाच्या एका सात वर्षीय शाळकरी मुलीला पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Moksha Roy
Moksha RoyDainik Gomantak
Published on
Updated on

Points of Light' Award: भारतीय वंशाच्या एका सात वर्षीय शाळकरी मुलीला पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खरे तर, ही विद्यार्थिनी वयाच्या अवघ्या तीन वर्षापासून मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर काम करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ब्रिटनचे उपपंतप्रधान ऑलिव्हर डाउडेन यांनी मोक्षा रॉय या भारतीय वंशाच्या शाळकरी मुलीला या पुरस्काराने सन्मानित केले.

गरजू मुलांना मदत करण्यासाठी निधी उभारण्यासह अनेक मोहिमांमध्ये चांगले काम केल्याबद्दल तिला या पुरस्काराने गौरवण्यात आले.

ब्रिटनचे उपपंतप्रधान ऑलिव्हर डाउडेन म्हणाले की, मोक्षाने संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी काम केले आहे. या गोष्टींना शालेय अभ्यासक्रमात स्थान मिळावे यासाठी तिने बराच काळ संघर्ष केला. डॉउडेन पुढे म्हणाले की, ती जागतिक नेत्यांच्या संपर्कात आहे.

Moksha Roy
Titanic Submarine: टायटन पाणबुडीच्या मालकाला माहित होते, "आपल्या प्रवासाचा भयानक अंत होणार..."

पॉइंट्स ऑफ लाइट अवॉर्ड मिळाल्याने आनंद झाला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोक्षा रॉय हिने भारतातील वंचित मुलांसाठीही काम केली आहे. दुसरीकडे, मोक्षाने सांगितले की, मला पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद होत आहे. मला आशा आहे की सर्वांना हे समजेल की, प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवून आणणे हे काही मोजक्या लोकांचे काम नाही.

Moksha Roy
Brain Eating Amoeba: दोन वर्षांचा चिमुरडा मेंदू खाणाऱ्या अमीबाचा बळी; आईच्या भावनिक पोस्ट ने सर्वत्र हळहळ

मोक्षाच्या पालकांनी आनंद व्यक्त केला

मोक्षाने पुढे सांगितले की, आम्ही दात त्यांची काळजी घेण्यासाठी आणि वेदना टाळण्यासाठी ब्रश करतो. त्याचप्रमाणे आपण या ग्रहाची काळजी इतरांसाठी पण स्वतःसाठी, सुरक्षित राहण्यासाठी घेतली पाहिजे.

हवामान बदल, प्रदूषण (Pollution), दारिद्र्य आणि असमानता यांचा सामना करण्यासाठी आपण सर्वजण आपल्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टी करु शकतो.

मोक्षाचे आई-वडील रागिणी आणि सौरव रॉय म्हणाले की, त्यांच्या मुलीच्या प्रयत्नातून हे सिद्ध होते की, समाजातील लहान मुलांचीही वातावरणातील बदलांशी लढा देऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com