Pok भारताचा अविभाज्य भाग, नकाशा दाखवत युएईने पाकिस्तानला फटकारले

UAE On Pok: गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान काश्मीरबाबत मुस्लिम देशांमध्ये अपप्रचार करत आहे. नुकतेच भारतात झालेल्या G20 परिषदेदरम्यान त्यांनी सदस्य देशांना पत्र लिहून भारतावर खोटे आरोप केले होते.
UAE Recognizes PoK As India's Part
UAE Recognizes PoK As India's PartDainik Gomantak
Published on
Updated on

UAE Deputy Prime Minister Saif Bin Zayed Al Nahyan Shared A Video In Which They Recognizes PoK As Integral Part Of India:

पाकव्याप्त काश्मीरबाबत (Pok) पाकिस्तानने केलेला अपप्रचार सातत्याने फोल ठरत आहे. एकेकाळी पाकिस्तानचा मित्र असलेल्या संयुक्त अरब अमिरातीनेही (UAE) पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे.

UAE चे उपपंतप्रधान सैफ बिन झायेद अल नाहयान यांनी भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जम्मू-काश्मीरचा संपूर्ण प्रदेश भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. त्यात पीओके आणि अक्साई चिनचा भाग देखील समाविष्ट आहे.

उपपंतप्रधान सैफ बिन झायेद अल नाहयान यांचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे कारण, काश्मीरमध्ये ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. दुबईस्थित रिअल इस्टेट डेव्हलपर, Emaar, श्रीनगरमधील 1 दशलक्ष चौरस फुटांच्या मेगा-मॉलमध्ये गुंतवणूक करणारी पहिली विदेशी कंपनी ठरली आहे.

2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर एमार कंपनीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. हा मेगा-मॉल उभारण्यासाठी एमार ग्रुप 250 कोटी रुपये गुंतवणार आहे. जो देशातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असेल. जम्मू-काश्मीरमधील ही पहिली थेट विदेशी गुंतवणूक आहे.

UAE Recognizes PoK As India's Part
Viral Video: आणखी किती पाहिजेत? 250 रुपये टीप देऊनही नाराज डिलिव्हरी बॉय फूड ऑर्डरवर थुंकला

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान काश्मीरबाबत मुस्लिम देशांमध्ये अपप्रचार करत आहे. नुकतेच भारतात झालेल्या G20 परिषदेदरम्यान त्यांनी सदस्य देशांना पत्र लिहून भारतावर खोटे आरोप केले होते.

भारत काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. अशा परिस्थितीत भारताला आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे पालन करण्यास सांगणे ही G20 सदस्य देशांची जबाबदारी आहे, असे पाकिस्तानने म्हटले होते.

यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील जी-20 बैठकीवरही पाकिस्तानने आक्षेप घेतला होता आणि हा वादग्रस्त भाग असल्याचे म्हटले होते. मात्र, पाकिस्तानच्या आरोपांचा कोणावरही परिणाम झाला नाही.

UAE Recognizes PoK As India's Part
Heart Attack: 12 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, वाढत्या प्रकरणांमुळे डॉक्टर चिंतेत

पाकव्याप्त काश्मीरमधील वाढलेली महागाई, अन्नधान्य टंचाई आणि अवाजवी कराविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी लोक पाकिस्तानला दोष देत आहेत.

अलीकडेच पीओकेच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाकिस्तानपासून त्यांना स्वातंत्र करण्याची मागणी केली होती. त्यांच्यावर जाणीवपूर्वक अत्याचार केले जात आहेत, तर पंजाब प्रांताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. असे आरोप तेथील लोक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com