Heart Attack: 12 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, वाढत्या प्रकरणांमुळे डॉक्टर चिंतेत

Heart Attack In Youth: 20-30 वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका देखील सामान्य होत आहे. 2000-2016 दरम्यान या तरुण वयोगटातील हृदयविकाराचाचा धोका दरवर्षी 2% वाढत आहे.
12-year-old boy dies of heart attack in Gujarat, doctors express concern.
12-year-old boy dies of heart attack in Gujarat, doctors express concern.Dainik Gomantak
Published on
Updated on

12-year-old boy dies of heart attack in Gujarat, doctors express concern:

जागतिक स्तरावर हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जीवनशैली आणि आहारातील विस्कळीतपणामुळे हृदयाच्या समस्या झपाट्याने वाढल्या आहेत. आणि कोरोनाच्या धोक्यामुळे ते अधिक गंभीर झाले आहे.

काही दशकांपूर्वीपर्यंत, हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या वृद्धत्वाशी निगडीत समस्या म्हणून ओळखल्या जात होत्या, परंतु आता तरुण लोक देखील त्याचे बळी ठरत आहेत.

अशाच एका ताज्या प्रकरणात, गुजरातमध्ये एका सहावीत शिकणाऱ्या मुलाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्याचे वय फक्त 12 वर्षे होते. एवढ्या लहान वयात हृदयविकाराच्या झटक्याने सगळ्यांनाच चिंतेत टाकले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्वारका आणि राजकोट शहरात अनुक्रमे 12 वर्षीय आणि 20 वर्षांच्या मुलाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सहा वर्षांच्या मृताच्या वडिलांनी सांगितले की त्यांनी कोविडची लस घेतली नव्हती, मात्र यामागे कोरोनाचा संसर्ग कारणीभूत आहे की नाही याची सध्या पुष्टी झालेली नाही.

12-year-old boy dies of heart attack in Gujarat, doctors express concern.
बहीण 'कुटुंबाचा' भाग नसते, मृत भावाच्या जागी नोकरी मिळू शकत नाही: हायकोर्टाचा निर्णय

तरुण वयात हृदयविकाराची समस्या

आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकाराची समस्या खूप गंभीर असू शकते, त्यासाठी विशेष दक्षतेची गरज आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत हृदयविकाराचा झटका ही मुख्यत्वे वृद्ध व्यक्तींना येत होती. 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या अत्यंत दुर्मिळ मानल्या जात होत्या. मात्र, आता हृदयविकाराच्या प्रत्येक 5 रुग्णांपैकी 1 रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे.

20-30 वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका देखील सामान्य होत आहे. 2000-2016 दरम्यान या तरुण वयोगटातील हृदयविकाराचाचा धोका दरवर्षी 2% वाढत आहे.

12-year-old boy dies of heart attack in Gujarat, doctors express concern.
निर्दयी! 10 वर्षांच्या लेकीची लंडनमध्ये हत्या, पाकिस्तानला पळालेल्या बाप आणि सावत्र आईला अखेर बेड्या

उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचा धोका वाढवण्याचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांसाठी हा एक मोठा धोका मानला जातो.

जास्त वजन असण्याची समस्या देखील उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव वाढण्याचा धोका असतो, जो केवळ हृदयविकाराचा एक प्रमुख धोका घटक नसून स्ट्रोक देखील होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com