Pakistan Occupied Kashmir: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दोन वेळच्या अन्नासाठी लोक संघर्ष करत आहेत. याचदरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पाकिस्तान दडपशाहीचे धोरण अवलंबत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने लाँग मार्चची हाक दिली होती. टॅक्स, महागाई, वीज टंचाई या मुद्द्यांवर आंदोलन करणाऱ्या जनेतवर पाकिस्तानी पोलिस आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या कराराचे पालन करण्यासाठी पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्यासाठी जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने शुक्रवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. पाकिस्तान सरकार दिलेल्या वचनाची पूर्तता करत नसल्याचा आरोप समितीने केला.
शनिवारी पाकिस्तान पोलीस आणि पाकिस्तान रेंजर्संनी काश्मिरींवर कडक कारवाई केली. त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मोठ्या प्रमाणावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या कारवाईत दोन आंदोलकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांचे आंदोलन दडपण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार काश्मिरींना गुलामांसारखी वागणूक देत आहे. येथे टॅक्स, महागाई आणि वीज लोडशेडिंगच्या विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्यात आले. आंदोलकांनी शनिवारी 11 मे रोजी मीरपूरच्या दादियाल तहसीलमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याची योजना आखली होती. मात्र त्याआधीच पाकिस्तानी पोलिसांनी दडपशाही सुरु केली. पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. याशिवाय, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
पाकिस्तान सरकार स्थानिक आंदोलकांवर बळाचा वापर करत आहे. आंदोलकांना दडपण्यासाठी पाकिस्तान पोलिसांव्यतिरिक्त पाकिस्तानी रेंजर्स आणि अगदी फ्रंटियर कॉर्प्स देखील तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तान पोलीस आणि लष्कराच्या या कारवाईत दोन जणांचा मृत्यू झाला असून डझनभर जखमी झाले आहेत. सुमारे 70 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दुसरीकडे, वाढती महागाई आणि वीज बिलात वाढ याविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. पाकिस्तान सरकारने वीज बिलावरील सबसिडी रद्द केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कर्जाच्या अटी पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही सबसिडी रद्द केली. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी केवळ आयएमएफच्या कर्जाचा आधार आहे. परंतु आयएमएफने कर्ज देण्यासाठी ज्या अटी ठेवल्या आहेत, त्यामध्ये सरकारने आपल्या खर्चाची पद्धत सुधारण्याचीही अट आहे. सबसिडीवर मोठी रक्कम खर्च केली जाते, म्हणून पाकिस्तान सरकारने ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विजेचे दर लक्षणीय वाढले आहेत.
दरम्यान, आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला. पोलिस आणि निमलष्करी दलाने आंदोलकांवर कडक कारवाई केल्यावर त्यांचा राग पोलिसांच्या वाहनांवरच निघाल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक लोक सशस्त्र पोलीस आणि सैन्याविरुद्ध नि:शस्त्र लढत आहेत.
आंदोलन चिरडण्यासाठी पाकिस्तान हिंसाचाराचा अवलंब करत आहे. प्रशासनाने पाकिस्तान रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सच्या जवानांसह अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. पाकिस्तानी सैन्याने लहान मुलांनाही सोडले नाही. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्या शाळेच्या आत पडल्या. अनेक मुले जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.