Haiti Crime News: हैती या कॅरिबियन राष्ट्राची राजधानी असलेल्या पोर्ट ओ प्रिन्समधील (Port Au Prince) विवादित क्षेत्रांमध्ये रिपोर्टिंग करत असताना दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी यासंबंधीची माहिती दिली. या कॅरिबियन देशात (Haiti Violent Crime Rate) हिंसाचार वाढत आहे. पत्रकाराच्या (Journalists) नियोक्त्याने आणि काही मीडिया रिपोर्ट्सने असे सुचवले आहे की, दोघांनाही गोळ्या घालून जिवंत जाळण्यात आले. मात्र, पोलिसांनी (Police) याला दुजोरा दिला नाही. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतदेहांवर "गोळ्यांच्या खुणा" होत्या.
रेडिओ इकूट एफएमने म्हटले की, पत्रकार जॉन वेस्ली अमाडी यांना गुरुवारी लाबूलमध्ये 'सशस्त्र डाकूंनी' ठार मारले जेव्हा ते टोळीग्रस्त भागात सुरक्षा समस्यांबद्दल अहवाल देत होते (Is Haiti Violent). स्टेशनचे महाव्यवस्थापक फ्रँकी अॅटिस म्हणाले, "आम्ही या गुन्हेगारी आणि रानटी कृत्याचा तीव्र निषेध करतो, जे पत्रकारांच्या जीवन जगण्याच्या अधिकारांवर, विशेषत: पत्रकारांच्या देशात मुक्तपणे काम करण्याच्या अधिकारांवर आक्रमण त्यांचाही आम्ही निषेध करतो." डू यांनी अमादीच्या मृत्यूची पुष्टी केली.
तिसरा पत्रकार फरार झाला
तीन पत्रकार घटनास्थळी गेले होते, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर तिसरा पळून गेल्याचे वृत्त आहे. हैतीमधील (Haiti) ऑनलाइन मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष गॉडसन लेब्रुन म्हणाले, '2022 च्या सुरुवातीला या सशस्त्र डाकूंनी हैतीवर पुन्हा हल्ला केला (Haiti Crime Rate 2021). हैतीमधील सध्यस्थितीचे वार्तांकन करत असल्यामुळे या पत्रकारांना मारण्यात आले. याप्रकरणी तात्काळ चौकशी करुन न्याय मिळावा, अशी माझी मागणी आहे.
या हत्येबद्दल संयुक्त राष्ट्राने व्यक्त केला शोक
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राचे (United Nations) प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, "जगभरातील पत्रकारांना अशा संघर्षमय परिस्थितीला सामोरे जावे लागते याचे हे आणखी एक उदाहरण आहे. दुर्दैवाने, सत्य सांगण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांची हत्या केली जाते. आम्ही यासाठी केवळ शिक्षेचीच अपेक्षा करु शकतो.' हैती पंतप्रधान एरियल हेन्री (Prime Minister Ariel Henry) यांनी त्या टोळ्यांवर (Haiti Crime Rate) कारवाई करण्याचा संकल्प केला आहे. अधिकाऱ्यांनी या सशस्त्र टोळ्यांवर अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ आणि गॅस वितरण टर्मिनल्सवर नाकेबंदी केल्याचा ठपका ठेवला आहे, ज्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.