Twitter Blue Tick: डीपी बदलल्यास ब्लू टिक जाणार, जाणून घ्या ट्विटरमध्ये काय नवीन बदल होणार

सबस्क्रिप्शन युजर्सनां इतर युजर्सच्या तुलनेत 50 टक्के कमी जाहिराती दिसतील.
Twitter Blue tick
Twitter Blue tick
Published on
Updated on

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने पुन्हा एकदा 'ट्विटर ब्लू' (Twitter Blue Tick) ही सशुल्क प्रीमियम सेवा सुरू केली आहे. कंपनीने काही बदलांसह आजपासून (सोमवार) ही सेवा सुरू केली आहे. ट्विटर युझर आता ब्लू व्हेरिफाईड खाते आणि विशेष सेवा मिळविण्यासाठी ट्विटरची ब्लूचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. बनावट खात्यांच्या समस्येमुळे ही सेवा काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती.

Twitter Blue tick
Elon Musk: इलॉन मस्क यांची ट्विटर कर्मचार्‍यांना धमकी; तर...थेट खटला करणार दाखल

"आम्ही सोमवारी Twitter ब्लू पुन्हा लाँच करत आहोत. युझर वेबवर सदस्यता घेण्यासाठी दरमहा $8 आणि iOS वर ब्लू चेकमार्कसह विविध सेवा मिळवण्यासाठी दरमहा $11 देतील." असे ट्विट करून शनिवारी ही सेवा पुन्हा सुरू केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर, तुम्हाला ट्विट एडिट करणे, 1080p व्हिडिओ अपलोड आणि ब्लू टिक अशा सुविधा मिळणार आहेत. केवळ व्हेरिफाईड फोन नंबर असलेल्या वापरकर्त्यांनाच ही सेवा मिळेल.

Twitter Blue tick
Vice President of Argentina: अर्जेंटिनाच्या उपराष्ट्राध्यक्ष क्रिस्टिना यांना 'या' गुन्ह्यासाठी 6 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

काय सुविधा मिळणार

- केलेले ट्विट 30 मिनिटांच्या आत ट्वीट एडिट करता येतील.

- 1080p व्हिडिओ देखील अपलोड करता येऊ शकतो. यासोबतच लांबलचक ट्विटही करता येतील.

- सबस्क्रिप्शन युजर्सनां इतर युजर्सच्या तुलनेत 50 टक्के कमी जाहिराती दिसतील.

- युजर्सने प्रोफाइलवरील फोटो किंवा नाव बदलले तर त्यांची ब्लू टिक काढून टाकली जाईल आणि पुन्हा पडताळणी केल्यानंतर पुन्हा ब्लू टिक दिली जाईल.

- सबस्क्रिप्शन सेवेची किंमत प्रति महिना $8 डॉलर असेल, तर Apple iOS साठी साइन अप करण्यासाठी प्रति महिना $11 डॉलर खर्च येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com