Elon Musk: 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? मस्कच्या नव्या ट्विटने खळबळ

एलन मस्कने केलेल्या नव्या ट्विटमुळे सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे.
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

एलन मस्कने केलेल्या नव्या ट्विटमुळे सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे. ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांच्या नव्या ट्विटने सोशल मिडियावर खळबळ माजली आहे. मस्क यांनी युजर्सचा पोल घेत विचारले की 'मी ट्विटरचे CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसे मी करेन.' मस्क यांच्या एका ट्विटमुळे अनेक उद्योदपती आणि कर्मचाऱ्यांच भविष्य ठरत असेल असे म्हणावे लागेल. ट्विटर खरेदी करण्यापासून ते सर्व गोष्टी त्यांनी ट्टिट करत दिली आहे.

  • ट्विटरवर पोल घेत नेटकऱ्यांना विचारला हा प्रश्न

एलन मस्क यांनी आज सकाळीच एक ट्विट केले असून हे ट्वीट प्रचंड सोशल मिडियावर चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये मस्क यांनी लोकांना विचारले की, मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? या ट्वीटनंतर लोकांनी ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Elon Musk
Elon Musk: एलन मस्क यांनी 3 दिवसात विकले टेस्लाचे 22 मिलियन शेअर्स; ट्विटर खरेदीमुळे अडचणीत आल्याची चर्चा...

सुमारे 1 लाख 30 हजार लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केले आहे. मस्क यांच्या या ट्विटरपोलवर आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. ज्यामध्ये 57 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा देण्याचे समर्थनार्थ मतदान केले आहे.

दरम्यान, ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या खरेदीनंतर जगातील सर्वांधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एलन मस्क हे अडचणी आल्याचे दिसत आहे. कारण गेल्या काही काळात ते सतत टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे शेअर्स विकत आहेत. गेल्या 3 दिवसांतच त्यांनी टेस्लाचे सुमारे 22 मिलियन (2.2 कोटी) शेअर्स विकले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com