Turkish Airlines: तुर्कीच्या विमानाचे कोलकत्यात इमर्जन्सी लँडिंग

Emergency Landing: तुर्की एअरलाइन्सच्या फ्लाइट TK-054 मधील एक प्रवासी अचानक आजारी पडला.
Turkish Airlines
Turkish AirlinesDainik Gomantak
Published on
Updated on

इस्तंबूलहून सिंगापूरला जाणार्‍या तुर्की (Turkish) एअरलाइन्सच्या विमानाचे गुरुवारी म्हणजेच 6 ऑक्टोबरला कोलकाताच्या एनएससी बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. फ्लाइटमध्ये 69 वर्षीय प्रवासी आचानक आजारी पडल्याने हे लँडिंग करण्यात आले होते.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, वृद्ध प्रवाशाच्या नाकातून आणि तोंडातून अचानक रक्तस्त्राव होत असल्याने वैमानिकाने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्याचा निर्णय घेतला.

* आजारी प्रवाशाला रुग्णालयात पाठवले 

एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून क्लिअरन्स मिळाल्यानंतर सकाळी 11.45 वाजता फ्लाइट लँड झाले. आजारी प्रवाशावर प्रथम विमानतळावर उपचार करण्यात आले आणि नंतर त्याला रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. इतर सर्व प्रवाशांसह विमानाने दुपारी 2.30 वाजता पुन्हा प्रवास सुरू केला. 

Turkish Airlines
Global Recession: 2023 मध्ये एक तृतीयांश देशांना करावा लागू शकतो मंदीचा सामना!

* फ्लॅटचे आपत्कालीन लँडिंग 

गेल्या काही काळापासून फ्लॅटचे इमर्जन्सी लँडिंग सातत्याने पाहायला मिळत आहे. मात्र, यावेळी प्रकरण थोडे वेगळे होते आणि एक व्यक्ती आजारी पडल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यानंतर विमानाने रुग्णाला उपचारासाठी पुन्हा सिंगापूरला (Singapore) रवाना केले. 

* कोणत्याही देशात इमर्जन्सी लँडिंग करता येते का?

परवानगी घेतल्यानंतर कोणत्याही देशात इमर्जन्सी लँडिंग करता येते. कोणताही देश आपत्कालीन लँडिंगला नकार देत नाही. फ्लाइटमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा एखाद्याच्या जीवाला धोका असल्यास, नियमांनुसार, कोणताही देश त्यास मनाई करत नाही. ज्या देशाची हवाई हद्द त्या देशावर आहे त्या देशाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाची उड्डाणाला सुरक्षित रस्ता देणे ही जबाबदारी आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com