Global Recession: 2023 मध्ये एक तृतीयांश देशांना करावा लागू शकतो मंदीचा सामना!

IMF Update: 2023 मध्ये जगातील अनेक देशांना मंदीच्या परिस्थितीला सामोरे जावू लागू शकते.
Kristalina Georgieva
Kristalina GeorgievaDainik Gomantak
Published on
Updated on

Global Recession: 2023 मध्ये जगातील अनेक देशांना मंदीच्या परिस्थितीला सामोरे जावू लागू शकते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी हा इशारा दिला आहे. जॉर्जिव्हा म्हणाल्या की, 'पुढील वर्षी एक तृतीयांश देशांना दोन तिमाहीत मंदीच्या स्थितीप्रमाणेच आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.' अशा परिस्थितीत आयएमएफ आपले आर्थिक अंदाज कमी करण्याची तयारी करत आहे.

दरम्यान, IMF आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, 'लोकांच्या उत्पन्नात घट आणि महागाई (Inflation) वाढणे याचा अर्थ अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागणार आहे.' आयएमएफ प्रमुखांच्या या वक्तव्यांवरुन असा अंदाज वर्तवला जात आहे की, 'ते चौथ्या तिमाहीसाठी आर्थिक अंदाज कमी करु शकतात.'

Kristalina Georgieva
श्रीलंकेला IMF कडून आर्थिक दिलासा, 2.9 अरब डॉलरचे सशर्त पॅकेज लवकरच मिळणार

दुसरीकडे, युक्रेनवरील रशियाचा (Russia) हल्ला, ऊर्जेचे उच्च दर आणि अन्नधान्याच्या उच्च किमती यामुळे चलनवाढीचा दबाव वाढत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, 'जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांच्या विकासाची गती मंदावली आहे. अल्पावधीतच परिस्थिती बिकट होईल.' चीनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये निर्माण होत असलेल्या आर्थिक जोखमीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Kristalina Georgieva
''गहू निर्यात बंदीवर पुनर्विचार करण्यासाठी भारताला विनंती करणार'': IMF प्रमुख

शिवाय, चलनवाढीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी कठोर चलनविषयक धोरणाचे पाऊल पुढे चालू ठेवले पाहिजे, असे आयएमएफचे मत आहे. त्या शेवटी म्हणाल्या की, 'महागड्या खाद्यपदार्थांचा मोठा परिणाम उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर दिसून येत आहे, त्यामुळे या देशांवर कर्जाचे संकट वाढत आहे.' क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, 'जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेले हे संकट चिरकाल टिकणार नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com