Turkey-Syria Earthquake: आणखी एक चमत्कार! भूकंपाच्या तब्बल 13 दिवसानंतर ते जिवंत सापडले

Turkey-Syria Earthquake: आता त्यांना वाचवण्यात आल्यानं आनंद व्यक्त केला जात आहे.
Turkey-Syria Earthquake
Turkey-Syria EarthquakeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Turkey-Syria Earthquake: तुर्की आणि सीरीयाच्या भूकंपात मोठी जीवीतहानी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा 45000 वर गेला आहे. जगभरातून सीरीया आणि तुर्कीला मदत केली जात आहे. भूकंपाच्या ठिकणी बचावकार्य वेगाने सुरु असून इमारतींखाली दबलेल्या लोकांना वाचवण्याचे काम सुरु आहे.

आता 296 तास इमारतींच्या ढीगाऱ्यांखाली दबलेल्या 3 व्यक्तींना बचावपथकाला यश मिळाले आहे. हा एक चमत्कार असल्याचे मत सगळीकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे तीन व्यक्ती इमारतींच्या खाली अन्न-पाण्याशिवाय 13 दिवस अडकले होते. आता त्यांना वाचवण्यात आल्यानं आनंद व्यक्त केला जात आहे.

Turkey-Syria Earthquake
Seafood: कतार सरकारचा मोठा निर्णय, भारतातून सीफूड निर्यातीचा मार्ग मोकळा

दरम्यान, याआधी भूकंपाच्या 10 व्या दिवशी एक महिला आणि दोन मुलांना वाचवण्यात आले होते. भूकंपातून वाचवलेल्या अनेक माणसांच्या आणि प्राण्यांच्यादेखील भावनिक फोटो यापुर्वी समोर आले होते. तुर्की ( Turkey )तील भूकंपाच्या तब्बल तेरा दिवसानंतर या तीन व्यक्तींचे वाचणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही असे मत व्यक्त केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Horoscope Today September 27, 2026
UN General Assembly Viral Video Syria Leader Phone
Bashar Al Assad Death Sentence Syria Court
Valshi Pond Crocodile
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com