जपानमध्ये त्सुनामी, 3 फुटांपर्यंत उसळू शकतात लाटा

टोंगाच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत आणि लोक बचावासाठी उंच ठिकाणी गेले आहेत.
 Japan Tsunami
Japan TsunamiDainik Gomantak
Published on
Updated on

न्यूझीलंडच्या जवळ असलेल्या टोंगा या देशाजवळ पॅसिफिक महासागरात ज्वालामुखीचा उद्रेक होऊन टोंगामध्ये त्सुनामी आली. यासोबतच देशात त्सुनामीचे आगमन झाल्याची माहिती जपानच्या हवामान खात्याकडून देण्यात आली असून 3 फूट उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. रशियामध्येही (Russia) सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. टोंगाच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत आणि लोक बचावासाठी उंच ठिकाणी गेले आहेत. हवाई, अलास्का आणि यूएस पॅसिफिक किनार्‍याकडे समुद्राच्या प्रचंड लाटाही सरकत असल्याने या भागात सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.(Russia Latest News)

नॅशनल वेदर सर्व्हिसचा सुनामी चेतावणी आता कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन, दक्षिणपूर्व आणि दक्षिण अलास्का (अलास्का द्वीपकल्पासह), ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा आणि अलेउटियन बेटे या यूएस राज्यांमध्ये वाढविण्यात आली आहे. या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाने किनारी भागात सतर्कतेची पातळी वाढवली आहे. एवढेच नाही तर मदत आणि बचाव पथकासह स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

 Japan Tsunami
पाकिस्तानी यूट्यूब चॅनल पंजाबी लहर: 74 वर्षांपासून विभक्त झालेल्या भावांना आणलं एकत्र

नेटवर्क इंटेलिजेंस कंपनी केंटिकचे कार्यकारी डग माडोरी यांच्या मते, या लाटांमुळे टोंगामध्ये कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या बेटावरील देशातील दळणवळण सेवा स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7.45 वाजता ठप्प झाली. टोंगामधील इंटरनेट सेवा फक्त फिजीहून सागरी केबलद्वारे उपलब्ध आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नुकसान झाल्याचा संशय आहे, कारण स्फोटानंतर 10 मिनिटांनी नेट सेवा खंडित झाली होती. टोंगा येथील हुंगा टोंगा हुंगा हापाई ज्वालामुखी येथे स्फोट झाला.

हवाईतील पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने सांगितले की, अर्धा मीटर उंचीपर्यंतच्या लाटा किनार्‍याकडे सरकताना दिसत आहेत. इंटरनेट मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या टोंगाच्या किनारी भागात घरे आणि इमारतींच्या आसपासच्या मोठ्या लाटा दिसत आहेत. न्यूझीलंडच्या सैन्याने सांगितले की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास मदत करण्यास तयार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com