पाकिस्तानी यूट्यूब चॅनल पंजाबी लहर: 74 वर्षांपासून विभक्त झालेल्या भावांना आणलं एकत्र

चॅनलने भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) 200 हून अधिक मित्र आणि कुटुंबांना एकत्र आणलं आहे.
Brothers
BrothersDainik Gomantak

भारत आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या ऐतिहासिक कर्तारपूर कॉरिडॉरप्रमाणे, पाकिस्तानी यूट्यूब चॅनल पंजाबी लहर देखील कुटुंबांना जोडण्यासाठी काम करत आहे. या यूट्यूब चॅनलने 74 वर्षांनंतर फाळणीमुळे विभक्त झालेल्या दोन भावांना एकत्र आणले आहे. ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी उभे आले. इतकंच नाही तर चॅनलने भारत (India) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) 200 हून अधिक मित्र आणि कुटुंबांना एकत्र आणलं आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल पंजाबी लहरचे झाले कौतुक

पाकिस्तानी यूट्यूब (Youtube) चॅनल पंजाबी लहरच्या ब्लॉगरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे कौतुक केले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, जेव्हा ते कर्तारपूर कॉरिडॉरवर भेटले तेव्हा दोघेही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाही. यावेळी उपस्थित कुटुंबीयांचेही डोळे भरुन आले. या भेटीने सर्वजण आनंदी होते. यावेळी दोघांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की, या कॉरिडॉरमुळे विभक्त कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्यास मदत होत आहे. त्यांच्या बैठकीला गुरुद्वारा व्यवस्थापनाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यांच्या भेटीचा आणखी एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Brothers
मुलांनंतर आता अफगाण नागरिकांना किडनीचा करावा लागतोय व्यापार

200 हून अधिक मित्र आणि कुटुंबे पुन्हा एकत्र: पंजाबी लहर

पाच लाखांहून अधिक यूजर्ससह YouTube चॅनल चालवणारे नासिर ढिल्लन म्हणतात की, चॅनेलचे उद्दिष्ट फाळणीमुळे निर्माण झालेल्या पूर्व आणि पश्चिम पंजाबमधील लोकांमधील दरी कमी करणे हा आहे.'' भारतीय आणि पाकिस्तानी पंजाबच्या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या मदतीने आम्ही सीमेपलीकडील 200 हून अधिक मित्र आणि कुटुंबे पुन्हा एकत्र आणली आहेत, असेही ढिल्लन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले.

बरेच लोक त्यांच्या कथा शेअर करतात: पंजाबी लहर

ढिल्लन पुढे म्हणाले, 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रक्तरंजित दंगलीत सीमेच्या दोन्ही बाजूचे लोक त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांपासून विभक्त झाल्याच्या कथा शेअर करतात. काही लिंक अशा व्हिडिओंद्वारे सापडतात जे शोधण्यात मदत करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com