8 वर्ष बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन, बेघर व्यक्तीला दिली 90 लाखांची नोकरी

फार्मर हा माजी IBF सुपर फेदरवेट चॅम्पियन आहे. त्याला 8 वर्षे कोणीही हरवू शकले नाही. पण 2012 मध्ये त्याला..
Boxing Champion

Boxing Champion

Dainik gomantak

Published on
Updated on

माजी यूएस बॉक्सिंग चॅम्पियन टेविन फार्मरने एका बेघर व्यक्तीला नोकरी देऊन त्याचे जीवन बदलले आहे. त्याने एका बेघर व्यक्तीला वर्षाला 90 लाख रुपये पगारावर नोकरीवर ठेवले आहे. ही माहिती आता समोर आली आहे. फार्मर हा माजी IBF सुपर फेदरवेट चॅम्पियन आहे. त्याला 8 वर्षे कोणीही हरवू शकले नाही. पण 2012 मध्ये त्याला जो पेड्राझा नावाच्या बॉक्सरने पराभूत केले होते. सध्या तो जानेवारी 2020 पासून एकही सामना खेळलेला नाही.

बातमीनुसार, सध्या तो बेघर आहे. मंगळवारी त्याने एका बेघर व्यक्तीला कामावर ठेवल्याचा खुलासा केला. जेणेकरून त्यांना काही प्रमाणात मदत करता येईल. बेघर व्यक्तीला दरमहा 7 लाख 50 हजार पगारही देणार आहे. याबाबत फार्मरने इंस्टाग्राम (Instagram) पोस्टही केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, "आज मी एका बेघर व्यक्तीला भेटलो. बाहेर कडाक्याच्या थंडीत तो होता. मी त्याला स्टोअरमध्ये नेले, जिथे त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी मिळाल्या. हॉटेलमध्ये (Hotel) त्यांची दोन आठवडे राहण्याची व्यवस्था केली. यासोबतच मी त्याला माझ्यासोबत काम करण्यासाठी नोकरीही दिली आहे. जेणेकरून तो स्वतःचा उदरनिर्वाह करेल.

<div class="paragraphs"><p>Boxing Champion</p></div>
मुस्लिम, इस्लाम आणि शरिया… एर्दोगन यांच्या विधानाने डॉलरच्या तुलनेत लिरा मजबूत

फार्मरने पुढे लिहिले, “मी समाधानी आहे. मला त्याला थंडीत थरथरताना पाहावत नव्हते. त्यामुळे आता एका वर्षात त्याचे आयुष्य बदलण्याचे माझे उद्दिष्ट आहे.” यासोबतच मी त्या व्यक्तीची ओळख उघड करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पण त्याला कोणते काम देणार हे सांगितले.

फार्मर म्हणाला, मी एका ट्रान्सपोर्ट (Transport) कंपनीचा मालक आहे. आणि या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. त्यामुळे मी या संबंधित त्याला काम देईन." फार्मरच्या या पोस्टला अनेकजण पसंती देत ​​आहेत. त्याच्या पोस्टला रिप्लाय देताना एका यूजरने लिहिले की, “हे काम दाखवते की तुम्ही सुपरस्टार आहात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com