मुस्लिम, इस्लाम आणि शरिया… एर्दोगन यांच्या विधानाने डॉलरच्या तुलनेत लिरा मजबूत

राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांच्या घोषणेनंतर देशाचे चलन असलेले लिरा डॉलरच्या तुलनेत काहीसं मजबूत झालं आहे.
Recep Tayyip Erdogan

Recep Tayyip Erdogan

Dainik Gomantak 

Published on
Updated on

तुर्कस्तानच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला काहीसा आधार मिळताना दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांच्या घोषणेनंतर देशाचे चलन असलेले लिरा (Turkish lira) डॉलरच्या तुलनेत काहीसं मजबूत झालं आहे. गेल्या एक वर्षापासून लिरा झपाट्याने घसरत होता. पण आता एर्दोगन यांच्या इस्लामशी संबंधित विधाने आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर कपातीमुळे तुर्कीचे (Turkey) चलन (Currency) लिरा डॉलरच्या तुलनेत 25 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. पूर्वी एका डॉलरची किंमत सुमारे 7.5 लीरा होती.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी डॉलर आणि लिरामधील फरक 14 पर्यंत वाढला होता. परंतु आता एर्दोनग यांच्या घोषणेनंतर एका डॉलरची किंमत 11.41 लीरा झाली आहे. ज्यांनी लिरामध्ये (Turkish lira) बचत केली आहे. त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे एर्दोन यांनी सोमवारी सांगितले. किंबहुना, लिराच्या घसरलेल्या किमती पाहता तुर्कस्तानच्या लोकांनी डॉलर खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तुर्कस्तानमध्ये डॉलरची मागणी आणखी वाढली. लिरा कमजोर होत असताना (Turkey Economy). यानंतर अध्यक्ष एर्दोगान अॅक्शन मोडमध्ये दिसले आणि त्यांनी इस्लामवर ज्ञान देण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकांना डॉलरऐवजी लिरामध्ये बचत करण्याचे आवाहन केले.

<div class="paragraphs"><p>Recep Tayyip Erdogan</p></div>
महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चीन करतोय कठोर कायद्याची तयारी

इस्लामिक कायदा टिकेल का अर्थव्यवस्था?

तुर्कस्तानची अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी एर्दोगन आजकाल विविध प्रयोग करत आहेत. त्यांनी व्याजदरातील कपातीचा संबंध मुस्लिमांशी आणि इस्लामशीही जोडला (Erdogan on Islam). आपल्या टीकाकारांच्या विधानांना उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही व्याजदर कमी करत आहोत. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्याकडून तशीच अपेक्षा करु शकता. एक मुस्लिम म्हणून, इस्लामिक कायदा आम्हाला जे करण्याची परवानगी देतो ते मी करेन. मी हे करत राहीन. हा इस्लामी कायदा आहे.

<div class="paragraphs"><p>Recep Tayyip Erdogan</p></div>
चीन करतोय युद्धाची तयारी,ड्रॅगन लष्करात मोठी भरती!

उच्च व्याज दरांचे श्रेय

अध्यक्ष एर्दोआन सतत महागाईसाठी उच्च व्याजदरांना जबाबदार धरत आहेत. परंतु त्यांचे म्हणणे अर्थशास्त्राच्या विरुद्ध मानले जाते. सर्वसाधारणपणे, जेव्हा महागाई वाढते तेव्हा व्याजदर (Interest Rate Turkey) वाढतात. पण एर्दोन यांनी महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात कपात करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एर्दोगन यांनी याचा संबंध इस्लामशी आणि स्वतः मुस्लिम असण्याशी जोडला. एर्दोगन यांनी 2019 पासून तीन सेंट्रल बँक गव्हर्नरांना व्याजदरांवरील मतभेदांमुळे काढून टाकले आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, मध्यवर्ती बँकेचा जागतिक साठा 22.47 अब्ज डॉलरपर्यंत घसरला आहे.

अमेरिकेने निर्बंध लादले

अमेरिकेच्या निर्बंधांमुळे (US Sanctions on Turkish) तुर्कीची अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर तुर्कस्तानवर निर्बंधांची घोषणा करणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते. तुर्की अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी नाटोचा सदस्य आहे. पण त्यांनी रशियाकडून हवाई संरक्षण प्रणाली S-400 खरेदी केली होती. त्यानंतर पुन्हा त्याची चाचणीही घेतली. त्यामुळे अमेरिकेने त्याच्यावर निर्बंध लादले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com