Tragic Road Accident In Canada: कॅनडात भीषण अपघात, 15 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक!

Tragic Road Accident In Canada: कॅनडातील मॅनिटोबा येथे एका रस्ते अपघातात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Accident News
Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Tragic Road Accident In Canada: कॅनडातील मॅनिटोबा येथे एका रस्ते अपघातात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस अधिकारी रॉब लॅसन यांच्या म्हणण्यानुसार, बस कारबेरीजवळील राज्य महामार्ग 5 वरुन दक्षिणेकडे प्रवास करत होती, तर सेमीट्रेलर महामार्ग 1 वरुन पूर्वेकडे जात होता. विनिपेगच्या पश्चिमेस अंदाजे 170 किलोमीटर (105 मैल) अंतरावर, कारबेरीच्या उत्तरेकडील दोन महामार्गांच्या छेदनबिंदूवर ही टक्कर झाली.

Accident News
Canada: गँगस्टर अमरप्रीत समराची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या, लग्न समारंभात गोळीबार!

लॅसन म्हणाले की, 'ही टक्कर इतकी भयंकर होती की, ज्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. दोन्ही वाहनांच्या चालकांसह 10 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बारा रुग्णवाहिका आणि एक एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाली.'

दुसरीकडे, आरोग्य सेवांचे कार्यकारी संचालक जेनिफर कॉम्पेस्टी यांनी या माहितीची पुष्टी केली. मॅनिटोबाच्या रस्त्यावर ही घटना घडली असल्याचे लॅसन यांनी सांगिले.

आरसीएमपीचे सहाय्यक आयुक्त रॉब हिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील बहुतेक प्रवासी डॉफिनच्या आसपासचे वृद्ध रहिवासी होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत पीडितांच्या कुटुंबीयांना या अपघाताची (Accident) माहिती नव्हती.

Accident News
Canada Hate Crime: कॅनडात मोठा गदारोळ, मशिदीबाहेर धार्मिक अपशब्द बोलण्यावरुन...

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी ट्विटरवर एका निवेदनात या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. कारबेरी, मॅनिटोबातील घटना अत्यंत वेदनादायक आहे, ट्रूडो यांनी लिहिले की, 'ज्यांनी आज आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांबरोबर आम्ही आहोत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com