Canada: गँगस्टर अमरप्रीत समराची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या, लग्न समारंभात गोळीबार!

Indian Origin Gangster: कॅनडामध्ये एका भारतीय वंशाच्या गॅंगस्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
Canada Crime
Canada CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Origin Gangster: कॅनडामध्ये एका भारतीय वंशाच्या गॅंगस्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तो एका रिसेप्शनसाठी जात असताना अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळी झाडली.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हत्येच्या अर्धा तास आधी तो आपल्या साथीदारांसह डान्स फ्लोअरवर डान्स करत होता. स्वागत स्थळाच्या बाहेर येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. पंजाबमधील अमरप्रीत (चक्की) समरा असे या गॅंगस्टरचे नाव आहे.

दरम्यान, अमरप्रीत कॅनडाच्या पोलिसांच्या (Police) हिटलिस्टवर होता. तो त्याचा गँगस्टर भाऊ रविंदरसोबत एका लग्न समारंभासाठी गेला होता. युनायटेड नेशन नावाच्या गॅंगसोबत तो वँकुव्हरमध्येच काम करत होता.

दुसरीकडे, लग्नसमारंभात काही अज्ञात लोक पोहोचले आणि त्यांनी डीजेला गाणी बंद करण्यास सांगितले. यावेळी, सभागृहात सुमारे 60 लोक उपस्थित होते. काही लोकांनी आपत्कालीन क्रमांक 911 वर कॉल केला आणि दक्षिण व्हँकुव्हर बँक्वेट हॉलजवळ कोणीतरी गोळी झाडल्याची माहिती पोलिसांना दिली.

Canada Crime
Canada Airport: कॅनडाच्या विमानतळावर 121 कोटींचे सोने चोरी; चोरट्यांनी कंटेनरच पळवला

अमरप्रीतला टार्गेट किलिंगची भीती

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला सीपीआरही दिला, मात्र त्याचा मृत्यू झाला. गॅंगमध्ये सुरु असलेल्या वादामुळेच अमरप्रीतची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

आरोपींचा (Accused) शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्वसामान्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी यासाठी 604-717-2500 हा फोन नंबरही जारी केला आहे.

Canada Crime
Canada Hate Crime: कॅनडात मोठा गदारोळ, मशिदीबाहेर धार्मिक अपशब्द बोलण्यावरुन...

कॅनडा पोलिसांच्या वॉर्निंग नोटिसमध्ये अमरप्रीतचा समावेश

गेल्या वर्षी, कॅनडा पोलिसांनी 11 लोकांची नावे जारी करत एक चेतावणी दिली होती. हे सर्वजण गॅंग वायलन्समध्ये सहभागी असल्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान कॅनडा पोलिसांनी सर्वसामान्यांना अशा गॅंगस्टरपासून सावध राहण्याची चेतावणी जारी केली होती.

अलर्टवर असलेल्या 11 लोकांमध्ये एकट्या पंजाबमधील 9 गॅंगस्टरचा समावेश आहे. अमरप्रीत आणि त्याचा भाऊ रविंदर यांचाही या यादीत समावेश आहे. प्रांतातील अनेक हत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com