Volodymyr Zelensky: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना टाईम मासिकाचा 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार

Volodymyr Zelensky On TIME Magazine: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना टाईम मासिकाने 'पर्सन ऑफ द इयर 2022' म्हणून घोषित केले आहे.
Volodymyr Zelensky
Volodymyr ZelenskyDainIK Gomantak

Volodymyr Zelensky On TIME Magazine: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना टाईम मासिकाने 'पर्सन ऑफ द इयर 2022' म्हणून घोषित केले आहे. टाईम मासिकाने बुधवारी ही घोषणा केली.

हा पुरस्कार गेल्या 12 महिन्यांत जागतिक घडामोडींवर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. पुरस्कारासाठी इतर अंतिम स्पर्धकांमध्ये इराणी विरोधक, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आणि यूएस सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होता.

दरम्यान, टाईम एडिटर-इन-चीफ एडवर्ड फेलसेन्थल यांनी सांगितले की, "युक्रेनसाठीचा त्यांचा लढा आम्हाला प्रेरणा देतो, व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी जगाला अशाप्रकारे प्रेरणा दिली की, आपण अनेक दशकांमध्ये असे पाहिले नाही." ते पुढे म्हणाले की, 'युक्रेनियन राष्ट्राध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय स्पष्ट होता.'

Volodymyr Zelensky
Volodymyr Zelensky: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारला भीषण अपघात

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु

युक्रेनची राजधानी कीव सोडण्यास नकार देताना, जेव्हा युद्ध सुरु झाले, तेव्हा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी युद्धग्रस्त देशातून प्रवास केला आणि जनतेला लढण्यासाठी धीर दिला, असे मासिकाने म्हटले आहे.

यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे.

Volodymyr Zelensky
Putin And Zelensky: पुतिन-झेलेन्स्की येणार एकाच मंचावर?

एलन मस्क यांना गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता

युक्रेनने धैर्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला, आत्तापर्यंत रशियाचा सामना करत आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन मस्क यांची 2021 मध्ये टाईमच्या "पर्सन ऑफ द इयर" म्हणून निवड करण्यात आली. TIME ने हा पुरस्कार 1927 मध्ये सुरु केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com