कोरोनाचा हाहाकार! तिसऱ्या लाटेमुळे शांघायमध्ये लोकांचे खायचे वांदे

शांघायमध्ये लोकं दिवसातून एकदाच जेवण करतात. कोविड परिस्थिती नियंत्रणाबाहेर
lockdown
lockdownDainik Gomantak
Published on
Updated on

बीजिंग: चीनमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट (China Coronavirus Third Wave) नियंत्रणाबाहेर जात आहे. कडक निर्बंध असूनही चीनमध्ये कोरोनाची विक्रमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे (Covid-19) 26 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, भारताने शांघायमधील वाणिज्य दूत सेवा निलंबित केली आहे.

lockdown
'किस करू नका, मिठी मारू नका' चीनमध्ये लॉकडाउनचे विचित्र नियम

चीनच्या प्रशासनाने बुधवारी सांगितले की, 12 एप्रिल रोजी कोरोनाचे 25,141 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर लक्षणे असलेले 1,189 रुग्ण आढळले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे प्रवक्ते म्हणाले, 'हे धोरण महामारीविरोधी प्रोटोकॉल विज्ञान आणि तज्ञांच्या मतावर आधारित आहे.'

येथे, लॉकडाऊनमुळे (Lockdown) शांघायमधील परिस्थिती बिकट होत आहे. जिआंग्सू, चांगझोऊ, शांघाय येथून काही फुटेज उघड झाले. जिथे लोकांची गर्दी दिसून येत आहे. आणि ते अत्यावश्यक वस्तूंसाठी सुरक्षा व्यवस्था तोडताना दिसत आहे. हा जमावाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, "चीनमधील सर्वात मोठे आणि श्रीमंत शहर शांघायमध्ये कोविड लॉकडाऊन अंतर्गत अन्नासाठी दंगा." इतर काही व्हिडिओ देखील शेअर केले आहेत ज्यात वैद्यकीय केंद्रे आणि सुपरमार्केटमध्ये या सामान्य जनतेची लुटमार सुरू आहे.

हाँगकाँग पोस्टनुसार, तिथले लोक म्हणतात की, ते दिवसातून एकदाच जेवण करतात. शांघायमधील कोविड परिस्थिती गंभीर होत आहे. शहर अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणजे तेथील रहिवाशांना आणखी काही दिवस घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.

त्याच वेळी, बीजिंगमधील भारतीय दूतावासाने सांगितले की शांघायमधील लॉकडाऊनमुळे कॉन्सुलेट जनरलशी संपर्क होऊ शकला नाही. शांघायमधील कौन्सुलेट जनरल वैयक्तिकरित्या कॉन्सुलर सेवा देऊ करण्याच्या स्थितीत नाही.

lockdown
युक्रेनियन तरुणी बनली भारताची सून; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जुळलं नातं

जगातील 77 दशलक्ष लोक गरिबीच्या खाईत

UN च्या अहवालात असे म्हटले आहे की कोविड-19 मुळे गेल्या वर्षी 77 दशलक्ष लोक गरिबीच्या खाईत गेले. कर्जावरील उच्च व्याजदरांमुळे अनेक विकसनशील देश महामारीच्या प्रभावातून सावरण्यात अक्षम आहेत. ही संख्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम होण्यापूर्वीची आहे. अहवालानुसार, श्रीमंत देश अत्यंत कमी व्याजावर कर्ज घेऊन महामारीमुळे झालेल्या घसरणीतून सावरतात, परंतु गरीब देशांनी त्यांचे कर्ज फेडण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com