'तिसऱ्या महायुद्धाचा धोका खरा' संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या भेटीपूर्वी रशियन परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य

आम्हाला सध्या युद्धविराम हा चांगला पर्याय वाटत नाही, पोलिआन्स्की
Russian Foreign Minister Sergey Lavrov
Russian Foreign Minister Sergey LavrovANI
Published on
Updated on

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांच्या रशिया (Russia) दौऱ्यापूर्वी, परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (Russia's Foreign Minister Sergey Lavrov) यांनी म्हटले आहे की, रशिया युक्रेनशी शांतता चर्चा सुरू ठेवेल. त्याचबरोबर तिसऱ्या महायुद्धाच्या (World War) 'खऱ्या' धोक्याचा इशाराही त्यांनी दिला. युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) 'वाटाघाटी करण्याचे नाटक करत', झेलेन्स्की एक 'चांगला अभिनेता' आहे, असे म्हणत लावरोव्ह यांनी अनेकांची चिंता वाढवली आहे. टोनियो गुटेरेस आज रशियाची राजधानी मॉस्कोला भेट देणार आहेत. येथे ते रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेणार आहेत. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही होणार आहे. (Russia Ukraine Updates)

गुटेरेस 28 एप्रिल रोजी युक्रेनची राजधानी कीवला भेट देतील, जिथे ते युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतील. याआधी रविवारी, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आशा व्यक्त केली की UN प्रमुख 26 एप्रिल रोजी रशियाच्या भेटीदरम्यान युक्रेनला जोरदार पाठिंबा देतील. झेलेन्स्की म्हणाले की, त्यांना संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांच्याकडून 100 टक्के समर्थन अपेक्षित आहे. युक्रेनपूर्वी गुटेरेस यांची रशियाची भेट घेणे हे चुकीचे पाऊल आहे.

Russian Foreign Minister Sergey Lavrov
संयुक्त राष्ट्राचे सचिव गुटेरेस यांच्या रशिया दौऱ्याकडे युक्रेनचे लक्ष

रशियाच्या दौऱ्यापूर्वी गुटेरेस सोमवारी तुर्कस्तानला पोहोचले

रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख गुटेरेस सोमवारी तुर्कस्तानमध्ये दाखल झाले. येथे त्यांनी राजधानी अंकारा येथे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगन यांची भेट घेतली. त्यानंतर ते मास्कोसाठी रवाना झाले.

'आम्हाला सध्या युद्धविराम हा चांगला पर्याय वाटत नाही'

वरिष्ठ रशियन मुत्सद्दी दिमित्री पोलिआन्स्की यांनी सोमवारी सांगितले की," मला वाटत नाही की युद्धविराम हा सध्या चांगला पर्याय आहे. कीवने मॉस्कोशी करार करण्यास नकार दिला आहे. तसेच कीवने ह्युमन कॉरिडॉरवरून रशियाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. युक्रेन मानवी कॉरिडॉर उघडण्याच्या आमच्या प्रयत्नांशी तडजोड करत आहे, त्यामुळे आत्ता युद्धविराम हा चांगला पर्याय आहे असे आम्हाला वाटत नाही,"

Russian Foreign Minister Sergey Lavrov
इमॅन्युएल मॅक्रॉन पुन्हा बनले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, मरीन यांचा दारुण पराभव

ब्रिटन युक्रेनला स्टॉर्मर आर्मर्ड वाहने पाठवणार

ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी सोमवारी सांगितले की, ब्रिटन युक्रेनला हवाई विरोधी क्षेपणास्त्रांसाठी लाँचर्ससह स्टॉर्मर बख्तरबंद वाहने पाठवेल. ब्रिटीश मूल्यांकनानुसार रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात सुमारे 15,000 रशियन कर्मचारी मारले गेले आहेत, तर 530 टॅंक, 60 हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांसह 2,000 चिलखती वाहने युक्रेनियन सैन्याने नष्ट केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com