इमॅन्युएल मॅक्रॉन पुन्हा बनले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, मरीन यांचा दारुण पराभव

French Presidential Election : या निवडणुकीत मॅक्रॉन यांना 58.2 टक्के मते मिळाली आहेत.
Emmanuel Macron
Emmanuel MacronDainik Gomantak
Published on
Updated on

फ्रान्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. फ्रान्सचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नेत्या मरीन ली पेन यांचा दारुण पराभव केला आहे. मॅक्रॉन यांची सलग दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत मॅक्रॉन यांना 58.2 टक्के मते मिळाली आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विजयानंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. संभाव्य हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा इशारा दिला आहे. युरोपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, अमेरिकेचीही नजर या निवडणुकीकडे होती. (Emmanuel Macron becomes President of France again)

Emmanuel Macron
राणांविरोधात 'मातोश्री'बाहेर आजींचा पहारा; मुख्यमंत्री ठाकरे सहकुटुंब भेटीला

कोरोना महामारी (Corona Pandemic) आणि रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्याला आणखी एक संधी देण्याचे आवाहन इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मतदारांना केले होते. ही निवडणूक जिंकून मॅक्रॉन हे गेल्या 20 वर्षात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे पहिले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

सर्व ओपिनियन पोलने इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विजयाची केली होती भविष्यवाणी

अलिकडच्या दिवसांतील सर्व जनमत चाचण्यांनी प्रो-युरोपियन मध्यवर्ती नेते मॅक्रॉन यांच्या विजयाचा अंदाज लावला आहे. मात्र, त्यांच्या आणि प्रतिस्पर्धी मरीन ली पेन यांच्या विजयाचे अंतर सहा ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यान असू शकते, असे सांगण्यात आले. दोन्ही उमेदवार डाव्या विचारसरणीच्या उमेदवारांची 77 लाख मते मिळविण्याचा प्रयत्न करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com