अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला H5 बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (USCDC) ने ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती पोल्ट्रीच्या थेट संपर्कात होती. हा व्यक्ती H5 बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांना मारण्याचे काम करत होता. सीडीसीने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, H5 बर्ड फ्लू विषाणूंच्या विशिष्ट गटातून मानवांमध्ये संसर्ग होण्याची ही दुसरी घटना आहे, तर अमेरिकेतील (America) ही पहिलीच घटना आहे.
सीडीसीने असेही म्हटले आहे की, ''या व्यक्तीला H5 बर्ड फ्लू च्या संसर्गाची लागण झाली असावी. एच 5 पॉझिटिव्ह व्यक्तीचे प्रकरण मानवी आरोग्यासाठी असलेल्या धोक्याचे आमचे मूल्यांकन बदलत नाही. यासाठी सीडीसी नियमित तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाय करत आहे. या उपायांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना रुग्णांचा देखील समावेश होतो. या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून आपण लस (Vaccine) बनवू शकतो.''
त्याच वेळी, कोलोरॅडो सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण विभागाने सांगितले की, ''आम्ही पोल्ट्रीच्या संपर्कात आलेल्या लोकांवर देखरेख आणि चाचणी करत आहोत. एव्हियन फ्लूची लागण झालेल्या वन्य पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही तपासणी केली जात आहे. एव्हियन फ्लूला H5N1 फ्लू असेही म्हणतात. एव्हीयन फ्लू पहिल्यांदा इंडियानामधील टर्कीच्या व्यावसायिक कळपात आढळून आला होता. त्याच वेळी, 2020 नंतर अमेरिकेत संसर्गाची ही पहिलीच घटना आहे.''
सध्या आयसोलेशनमध्ये
संक्रमित आढळलेल्या या व्यक्तीबद्दल, कोलोरॅडो आरोग्य विभागाने सांगितले की, ''हा व्यक्ती 40 वर्षांचा आहे. सध्या त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. CDC ने निर्देशित केल्यानुसार इन्फ्लूएंझा अँटीव्हायरल औषध Oseltamivir (Tamiflu) उपचारांसाठी दिले जात आहे. हा व्यक्ती संक्रमित पोल्ट्रीच्या संपर्कात होता.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.