चीनमधील 27 शहरात लॉकडाऊन; 16.5 कोटी लोक घरात कैद

तैवानमध्ये मागील 24 तासांत पहिल्यांदाच कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
China
China Dainik Gomantak

जगातील इतर देशांसोबतच आता चीनमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. परिणामी चीन (China) सरकारने 27 शहरांमध्ये लॉकडाऊन लावला आहे. यामुळे 16.5 कोटी लोकांना त्यांच्या घरात कैद रहावे लागत आहे. यामुळे लोकांची अडचण होत असल्याची माहिती समोर येत आहे. (27 cities in China under lockdown 16.5 crore people quarantined in their homes)

China
चीनची युक्ती फसली, पंतप्रधान हसीना यांनी भारताला देऊ केले चितगाव बंदर

महामारीच्या काळात चीन सरकार (China Government) आपल्या शून्य कोविड धोरणानी अंमलबजावणी करत आहे. या अंतर्गत लॉकडाऊन, मास टेस्टिंग, क्वारंटाईन आणि सीमा बंद करणे, लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करणे, आणि तुरुंगवास अशा कडक उपाययोजना केल्या जात आहेत. चीनच्या कठोरतेनंतरही कोरोना संसर्गाचा वेग कमी होत नाही आहे. या कठोर निर्बंधांमुळे लोकांना उपाशी राहावे लागत आहे, अशी माहिती चीन मधून येत आहे.

China
Quad Meetingमध्ये अमेरिका भारतापुढे मांडणार रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दा

तैवानमध्ये कोरोनाचा हाहाकार

तैवानमध्ये मागील 24 तासांत पहिल्यांदाच कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तैवान सरकारने अलीकडेच शून्य-कोविड धोरण काढून टाकण्याचा निर्णय घेतला, मात्र तो निर्णय चुकला असल्याचे आता सिद्ध झाले आहे. तैवानने पुन्हा एकदा आपल्या सीमा बंद केल्या आहेत आणि कडक निर्बंध लागू केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com