Elon Musk Twitter Deal: टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर डीलबाबत एक मोठी योजना आखली आहे. त्यांच्या या योजनेमुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या जवळपास कर्मचाऱ्यांवर 75 कर्मचाऱ्यांवर नोकरकपातीची तलवार टांगलेली असल्याचे समजते.
ट्विटरशी झालेल्या कराराबाबत मस्क यांनी गुंतवणुकदारांना सांगितले की, कंपनीच्या 7,500 पैकी 75 टक्के म्हणजे 5625 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मस्क यांचा हा प्लॅन समोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली असून त्यांच्याही हालचालींना वेग आला आहे. एकीकडे एलन मस्क असे बोलत असले तरी, ट्विटरने कर्मचाऱ्यांच्या कपातीचा काहीही प्लॅन नसल्याचे म्हटले आहे.
वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने मुलाखती आणि विविध दस्तऐवजांच्या आधारे ट्विटरमधील कर्मचारी कपातीची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आगामी काही महिन्यांमध्ये ट्विटरमध्ये कर्मचारी कपात होऊ शकते. ट्विटरची मालकी कुणाकडेही असो.
सध्याच्या व्यवस्थापनाने पुढील वर्षापर्यंत पे रोलमध्ये किमान ८० कोटी डॉलरची कपात करण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की ते मोठ्या प्रमाणात कपातीचा विचार करत नाही आहेत तथापि, दस्तऐवाजांमध्ये मात्र कर्मचारी कपातीची योजना दिसून येत आहे.
दरम्यान, ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र आता भीतीचे आणि अनिश्चित्ततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिवाय एलन मस्क हे जितके हुशार आहेत तितकेच ते लहरी आहेत. ते एका झटक्यात कोणताही निर्णय घेऊ शकतात. मस्क यांनी नुकतेच ट्विटर डीलबाबत खूप उत्साही असून प्रतीशेअर 54.20 डॉलर देण्याची ऑफर मस्क यांनी दिली आहे. ट्विटर आणखी मोठे होऊ शकते. यात विकासाची मोठी क्षमता आहे, असेही ते म्हणाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.