Israel-Hamas War: हमासने इस्रायलवर का केला हल्ला? जो बायडन यांच्या दाव्यानं खळबळ; वाचा संपूर्ण प्रकरण

इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या भीषण हल्ल्यामागे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

Joe Biden Statement: इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या भीषण हल्ल्यामागे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत, परंतु आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट याचे कनेक्शन भारताशी जोडले आहे.

बायडन म्हणाले की, हमासच्या हल्ल्याचे एक कारण म्हणजे भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. हा कॉरिडॉर संपूर्ण क्षेत्राला रेल्वे, रस्ते आणि बंदरांच्या जाळ्याने जोडणार आहे.

बायडन पुढे म्हणाले की, 'मला वाटते की हा कॉरिडॉर हमासच्या हल्ल्याचेही एक कारण आहे. माझ्याकडे याविषयी कोणताही पुरावा नाही, पण माझे मन हेच ​​सांगते. इस्त्रायलसह संपूर्ण प्रदेश याद्वारे जोडला जावा हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन पीएम अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी झालेल्या चर्चेत बायडन यांनी ही महत्तपूर्ण माहिती दिली. वास्तविक, हा कॉरिडॉर भारताला पश्चिम आशियामार्गे थेट युरोपशी जोडतो.

त्याचा मार्ग हैफा, इस्रायल मार्गे UAE मधून जातो. सौदी अरेबिया आणि अमेरिका हे त्याचे महत्त्वाचे भागीदार आहेत. युरोपमध्ये ते जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांना इटलीमार्गे जोडेल.

दिल्लीतच G-20 शिखर परिषदेदरम्यान याबाबतचा करार झाला होता. भारत आणि अमेरिकेशिवाय यूएई, सौदी अरेबिया, फ्रान्स (France), जर्मनी, इटली आणि युरोपियन युनियननेही या करारावर स्वाक्षरी केली आहे.

Joe Biden
Israel Hamas War: इस्रायलचे गाझामध्ये 24 तासांत 400 हल्ले, युद्ध सुरू झाल्यापासून एका दिवसात सर्वाधिक मृत्यू

दुसरीकडे, या कॉरिडॉरद्वारे भारताला आशा आहे की, तो आपला माल पश्चिम आशियामार्गे युरोपमध्ये पोहोचवेल. त्यामुळे वाहतूक सुलभ होईल. एवढेच नाही तर भारतात यासाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे.

या अंतर्गत, संपूर्ण देशाचे रेल्वे नेटवर्क पश्चिम बंदरांशी जोडले जाईल. हे असे होईल की, देशाच्या कोणत्याही भागातून कोणताही माल 36 तासांच्या आत बंदरांवर पोहोचू शकेल.

यातर्गंत दोन स्वतंत्र कॉरिडॉरही तयार केले जाणार आहेत. पहिला ईस्टर्न कॉरिडॉर असेल, जो भारताला (India) पश्चिम आशियाशी जोडेल.

Joe Biden
Israel Hamas War: इस्रायलचा निवासी इमारतीवर हल्ला 30 पॅलेस्टिनी ठार; 24 तासांत 266 जणांचा मृत्यू

यानंतर, दुसर्‍याला नॉर्थ कॉरिडॉर म्हटले जाईल, जो पश्चिम आशियापासून युरोपपर्यंत नेईल. या कॉरिडॉरमध्ये रेल्वे मार्ग, बंदरांचा विकास आणि रस्त्यांचे जाळे यांचाही समावेश आहे.

यातर्गंत केवळ भारतच नाही तर युरोपलाही दक्षिण पूर्व आशियाशी जोडणे आणि व्यापार अखंडपणे सुरु ठेवणे हे उद्दिष्ट आहे. अलीकडेच, बायडन यांनी या कॉरिडॉरचे कौतुक केले होते.

ते म्हणाले होते की, यामुळे दोन खंडांमध्ये समृद्धी येईल आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही आकर्षित होईल. दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाले असून नेत्यान्याहू यांनी कधीही जमिनीवरुन हल्ला करु असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com