रशियाचे युक्रेनवर आक्रमण झाल्यास, युक्रेनमधील लोक देशाचे रक्षण करण्यासाठी 'गुरिल्ला वॉरफेअर' आयोजित करण्याचा विचार करत आहेत. खार्किव शहर युक्रेनच्या सीमेपासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे हजारो रशियन सैन्य सिमेवर तैनात आहेत. विशेष म्हणजे हे युक्रेनचे (Ukraine) दुसरे मोठे शहर आणि औद्योगिक केंद्र देखील आहे, जिथे परिस्थिती तणावपूर्ण आहे. मात्र खार्किव शहरातील लोकांची मते विभागली गेली आहेत. काही युक्रेनच्या बाजूने आहेत तर काही रशियाच्या (Russia) बाजूने आहेत. त्यापैकी काही रशियाशी खंबीरपणे लढण्याबद्दल बोलतात तर काही शांततेत आयुष्य घालवण्याबद्दल बोलतात. (The People Of Ukraine Are Planning To Hold A Guerrilla Warfare To Defend The Country)
दरम्यान, दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरातील काही लोकांचे म्हणणे आहे की, जर रशियाने आक्रमण केले तर आम्ही त्यांच्याबरोबर निकराने लढू. त्याचबरोबर रशियन सैनिकांविरुद्ध गनिमी युद्ध पुकारतील (Russia Ukraine Conflict Region). किशोरवयीन मुलांना टेबल टेनिस शिकवणाऱ्या प्रशिक्षक व्हिक्टोरिया बालेसिना यांनी म्हटल की, 'हे शहर संरक्षित केले पाहिजे.' घाबरुन न जाता रशियाविरुध्द गनिमी युध्दाने लढण्यासाठी सज्ज असल्याचे नागरिक म्हणतात.
रशियासाठी वाईट अनुभव असू शकतो
यूएस गुप्तचर अधिकारी म्हणने आहे की, युक्रेनमधील अनेक शहरात दंतवैद्य, गृहिणी यांचे गनिमी युद्ध रशियन लष्करी रणनितीकारासांठी वाईट अनुभव असू शकतो. युक्रेनच्या लोकांनीही गनिमी युद्धाचा सराव सुरु केला आहे. ते पुढे म्हणतात, आम्ही रशियाला कोणत्याही परिस्थितीत हल्ला करु देणार नाहीत किंवा देशावर कब्जा करु देणार नाही. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील इतर देशही युक्रेनशी एकता दाखवत आहेत.
व्लादिमीर पुतिन यांनी मौन सोडले
याप्रकरणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी मौन सोडून सगळा दोष अमेरिकेवर (America) टाकला आहे. ते म्हणाले, अमेरिका युक्रेनच्या (Russia Ukraine Army) बहाण्याने रशियाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.' ''रशियाच्या प्रमुख मागण्यांकडेही तो दुर्लक्ष करत आहे. नाटो आपला विस्तार करणार नाही आणि पूर्वी सोव्हिएत देशांमध्ये असलेल्या देशांचा त्यात समावेश करणार नाही,'' असंही अमेरिकेने स्पष्ट करावे. यासोबतच पाश्चात्य देश रशियाच्या सीमेजवळ शस्त्रे तैनात करणार नाहीत. मात्र या मागण्या मान्य करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. यासह रशियाने हल्ला करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या समस्येवर लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.