पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची घोषणा, 2023 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार QUAD बैठक

ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे.
Australian Prime Minister Anthony Albanese
Australian Prime Minister Anthony AlbaneseTwitter / @AlboMP

ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. कॅनबेरा पुढील 2023 QUAD नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन करेल, असे त्यांनी सांगितले. अल्बानीज यांनी मंगळवारी QUAD नेत्यांशी - अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी उच्चस्तरीय बैठक संपवल्यानंतर ही घोषणा केली.

दरम्यान, बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात, अल्बानीज म्हणाले की, ऑस्ट्रेलियन सरकारचे प्राधान्य QUAD अजेंडाशी असणार आहे. हवामान बदलावर कारवाई करणे आवश्यक बनले आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता राखणे हे QUAD चे प्रमुख उद्दीष्ठ आहे.

Australian Prime Minister Anthony Albanese
स्कॉट मॉरिसन युगाचा अस्त, अँथनी अल्बानीज होणार ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान

दोन्ही देशाच्या फायद्यासाठी भारत-यूएसए गुंतवणूक

या दरम्यान'मला खात्री आहे की आमच्यातील 'भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार' गुंतवणुकीच्या दिशेने मजबूत प्रगती करेल. आम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमचे द्विपक्षीय सहकार्य वाढवत आहोत आणि जागतिक मुद्द्यांवरही समन्वय साधत आहोत.भारत-अमेरिका
(America) धोरणात्मक भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. अनेक क्षेत्रांमध्‍ये आमच्‍या सामायिक हितसंबंधांमुळे विश्‍वासाचे हे नाते घट्ट झाले आहे. आमच्यामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचा (Investment) सतत विस्तार होत आहे. मात्र, हे आपल्या ताकदीपेक्षा खूपच कमी आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या बैठकीत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com