9/11 Attack च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश (George W. Bush) यांनी दहशतवादाविरोधात युद्ध घोषित केले. अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना ते म्हणाले, 'दहशतवादाविरोधातील आमचे युद्ध अल-कायदापासून सुरु होते. परंतु जोपर्यंत जगातील एक एक दहशतवादी गट सापडत नाही, आणि त्यांच्या कारवाया जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार.'' मात्र एका अल-कायदा या दहशतवादी संघटनेला संपवण्यासाठी जगभरात अमेरिकेने अनेक अल-कायदा (Al-Qaeda) तयार केल्या.
अमेरिकेने दहशतवादाविरोधात सुरु केलेली जागतिक मोहीमेचा पहिला पडाव हा अफगाणिस्तान (Afghanistan) होता. जिथे सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिकेने तालिबानला (Taliban) निस्तानाबूत करत तेथील त्यांचे तालिबानी सरकार (Taliban government) उलथवून टाकले. 9//११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये खात्मा केला. मात्र अमेरिकेचं दुर्देवं की, ना अल कायदाला संपवलं ना जागतिक स्तरावर वाढत असलेल्या दहशतवादाला.
तथापि, अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर आणि ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदामध्ये मोठी दुफळी माजली. परंतु 2003 च्या अमेरिकेच्या आक्रमणानंतर त्याला इराकमध्ये आपल्या संघटनेची पुनर्रचना करण्याची संधी मिळाली. जॉर्डनमध्ये जन्मलेल्या अबू मुसाब अल-जरकावी याने इराकमध्ये पुन्हा अल कायदाला जिवंत केले. झरकावीने बगदादमधील राजकीय बदलांवर इराकच्या (Iraq) सुन्नी समाजाच्या नाराजीचा फायदा घेत आणि काही वर्षांतच इराकमध्ये अल-कायदाचा विस्तार करण्यास सुरुवात केली.
या 20 वर्षांत, अल-कायदा कधी कमकुवत झाला तर, कधी पुन्हा मजबूत झाला. पण त्याच्या विचारधारेत कोणताही बदल झाला नाही. दुसरीकडे, जर आपण अमेरिकेकडे पाहिले तर 20 वर्षांपूर्वीचे दहशतवादासंबंधीच्या धोरणात आज मोठा बदल झालेला दिसून येतो. अल कायदाला संपवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता, आज तोच अमेरिका अफगाणिस्तानातून पळून गेला. तालिबान सरकारवर अल कायदाचे वर्चस्व आहे ते सर्वश्रुत आहे.
अल कायदाचे बदलते स्वरुप
2001 मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानात अल कायदावर हल्ला केला तेव्हा तो अनेक भागांमध्ये विभागलेला होता. त्याचे काही नेते भूमिगत झाले होते. परंतु ते संपले नव्हते. गेल्या 20 वर्षांमध्ये, अल कायदाचे अनेक नवीन गट जगभरातील देशांमध्ये विकसित झाले. अमेरिकेने 2003 मध्ये इराकवर आक्रमण केल्यानंतर अबू मुसाब अल-जरकावी याच्या नेतृत्वाखाली अल कायदाने तेथे आपली शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, 2006 च्या हवाई हल्ल्यात अमेरिकेने अबू मुसाबला ठार मारण्यात आले. परंतु अल कायदा त्याच्या मृत्यूनंतर संपला नव्हता आणि आता इस्लामिक स्टेट ऑफ इराक (Islamic State of Iraq) बनून अल कायदा समोर आला. नंतर हे इस्लामिक स्टेट ऑफ इराक बनले, ज्याने 2014 मध्ये इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेट घोषित केले.
इस्लामिक स्टेटला पराभूत करण्यासाठी अमेरिका, इराण, इराक, कुर्दिश, शिया मिलिशिया, सीरिया आणि रशियाने मिळून त्यावर हल्ला केला. परंतु त्यांना पूर्णपणे संपवू शकले नाही. इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेट अजूनही मजबूत आहे. इस्लामिक स्टेटने विविध क्षेत्रांसाठी आपले नवीन गट तयार केले. पश्चिम आफ्रिकेसाठी आयएस पश्चिम आफ्रिका प्रांत आणि अफगाणिस्तानातील आयएस खोरासन प्रांताप्रमाणे. 26 ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही आयएस खोरासनने स्वीकारली आहे. ज्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 200 लोक मारले गेले. आता हा प्रश्न अमेरिकेसाठी खूप महत्वाचा आहे की 20 वर्षे अफगाणिस्तानात राहिल्यानंतर सुमारे 2 ट्रिलियन डॉलर्स खर्च केल्यानंतर आणि त्याच्या 2300 सैनिकांच्या शहीद झाल्यानंतर त्याला काय मिळाले?
अनेक अल कायदा युद्धग्रस्त देशांच्या पाठिंब्यावर उभे राहिले
द हिंदू मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, 11 सप्टेंबरपूर्वी अल कायदा अफगाणिस्तानमध्ये केंद्रित होता. पण अमेरिकेने त्यावर हल्ला करून त्याचे विभाजन केले. जिथून ते जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरले. इस्लामिक स्टेटने इराक आणि सीरियात त्याच्या खलिफावर हल्ला केला तेव्हा त्याने तेच केले आणि स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्याने अफगाणिस्तान, लिबिया आणि नायजेरियासारख्या युद्धग्रस्त देशांचा अवलंब केला. तेथे त्याने आपली नवीन शाखा उघडली. पूर्वी अल कायदा अफगाणिस्तानमध्ये केंद्रित होता. त्यामुळे त्यावर हल्ला करणे आणि त्याचा नाश करणे सोपे होते. पण आता अल-कायदा आशिया आणि आफ्रिका सारख्या खंडांमध्ये त्याच्या नवीन रूपांमध्ये पसरला आहे, ज्याचा नाश करणे अशक्य झाले आहे.
अमेरिका अफगाणिस्तानात का हरली?
अफगाणिस्तानात अमेरिकेच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे, त्याने फक्त अफगाणिस्तानच्या त्या भागात लक्ष केंद्रित केले जे शहरी होते. त्यांनी आपला मोर्चा कधीच अफगाणिस्तानमधील गावांकडे वळवला नाही. तर अफगाणिस्तानची 75% लोकसंख्या ती गावांमध्ये राहते. रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला करताना हीच चूक केली होती. आजही जे तालिबानी शिल्लक आहेत ते अफगाणिस्तानातील गावातून येतात. अफगाणिस्तानात अमेरिकेने आपले सर्व तळ त्याच ठिकाणी बांधले जे शहरी भागाच्या जवळ असतील.
बीबीसीच्या वृत्तानुसार, अमेरिकन सैनिकांनी कधीही अफगाणिस्तानच्या कोणत्याही गावात रात्र काढली नाही. दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे अफगाणिस्तान 2014 आणि 2019 च्या निवडणुका. ज्यात अशरफ घनी खरोखरच निवडणूक जिंकू शकले नाहीत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली. 2019 च्या निवडणुकीत विरोधी उमेदवार अब्दुल्ला अब्दुल्ला यांना प्रथम विजेता घोषित करण्यात आले. परंतु नंतर अमेरिकेच्या दबावामुळे अशरफ घनी यांना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे अफगाणिस्तानातील लोकांमध्ये अमेरिका आणि अशरफ घनी यांच्याविरोधात संताप निर्माण झाला. आणि या रागालाच तालिबान्यांनी हवा दिली, ज्यामुळे तो अफगाणिस्तानवर इतक्या वेगाने काबीज करु शकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.