ओमिक्रॉनमुळे कोरोनाची लाट आल्यास त्याचे भयंकर परिणाम : WHO

दझिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Omicron
OmicronDainik Gomantak
Published on
Updated on

साथीच्या रोगाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण आणि लोकांमधील वाढत चाललेल्या धस्तीला कुठेही अंत लागताना दिसत नाहीये. कोरोनामुळे एक ते दिड वर्ष लोकांनी आपल्या घरांमध्ये स्वतःला बंदिस्त करुन घेतले होते, मंदिरांपासून, शाळांपर्यंतची गर्दीची सर्व ठिकाणे बंद करण्यात आली होती. सर्व जग ठप्प झाल्यासारखे झाले होते ते आता सुरळीत होण्याच्या मार्गीवरती असताना पुन्हा कोरोनाचा 'ओमिक्रॉन' नावाच्या डेल्टा व्हेरियेंटने जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सोमवारी जगाला चेतावणी दिली की, कोविड-19 चा नवीन प्रकार 'ओमिक्रॉन'चा धोका जागतिक स्तरावर "खूप जास्त" आढळुन आला आहे. या बरोबरच, त्यांनी या गोष्टीवरती भर देऊन सांगितले आहे की, नवीन प्रकार किती संसर्गजन्य आणि धोकादायक आहे याबद्दल अनिश्चितता कायम आहे. डब्ल्यूएचओने एका नोटमध्ये असे म्हटले की, "जर ओमिक्रॉनमुळे कोविड-19 ची लाट आली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात." त्यांनी असेही सांगितले आहे की, 'आतापर्यंत, (Omicron) प्रकाराशी संबंधित अजुन तरी कोणताही मृत्यू झालेला नाही.'

Omicron
कुत्र्याची तब्बल 230 कोटींची प्रॉपर्टी विकणे आहे!

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, कोविड-19 चा नवीन प्रकार 'ओमिक्रॉन' हा डेल्टा फॉर्मसह इतर स्वरूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे की नाही आणि त्यामुळे अधिक गंभीर आजार होतात की नाही हे अजुन 'स्पष्ट' झालेली नाही. "ओमिक्रॉनशी संबंधित लक्षणे इतर प्रकारांपेक्षा वेगळी असल्याचे सूचित करण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही." ते म्हणाले की ओमिक्रॉन फॉर्मच्या तीव्रतेची पातळी समजण्यासाठी अनेक दिवस ते अनेक आठवडे लागतील.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, परंतु हे ओमिक्रॉनमुळे आहे की इतर घटक त्यास जबाबदार आहेत हे समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू आहेत. संस्थेने म्हटले आहे की प्राथमिक आकडे असे सांगतात की दक्षिण आफ्रिकेतील लोकांच्या हॉस्पिटलायझेशनमध्ये वाढ होत आहे, परंतु "हे ओमिक्रॉनच्या संसर्गाऐवजी सर्व प्रकारच्या संक्रमित लोकांच्या एकूण संख्येत वाढ झाल्यामुळे असू शकते."

'ओमिक्रॉन' हा प्रकार अनेक उत्परिवर्तनांचा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोविड B.1.1.1.529 चे अधिक सांसर्गिक स्वरूप पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेने जागतिक आरोग्य संघटनेला कळवले होते. यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल, यूके, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि नेदरलँडमध्येही याची ओळख पटली होती.

26 नोव्हेंबर रोजी, WHO ने त्याला 'चिंतेचे प्रकार' (Variant of Concern) असे वर्णन करून ओमिक्रॉन असे नाव दिले. WHO ची कोरोना विषाणूच्या धोकादायक प्रकारांची सर्वोच्च श्रेणी आहे. कोरोना विषाणूचे डेल्टा प्रकार देखील या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com