कुत्र्याची तब्बल 230 कोटींची प्रॉपर्टी विकणे आहे!

हा गंथर नावाचा कुत्रा तब्बल 430 कोटीं रुपयांचा मालक आहे. त्यातील 230 कोटींची हवेली विकण्यास काढली आहे.
Gunther Dog
Gunther DogDainik Gomantak
Published on
Updated on

कुत्रा, मांजर अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पाळीव प्राण्यांबद्दल आपल्या मनात कायमच एक सॉफ्ट कॉर्नर असतो. लहान बाळापासुन ते वृद्धापर्यंत सर्वांनाच मुक्या जिवांबद्दल मनात प्रेम असते. खेड्या गावामध्ये असुद्या किंवा मोठ मोठ्या शहरांमध्ये घरातील सदस्या प्रमाणे त्याला जिव लावताना दिसुन येते. कुत्र्याला जिव लावण्या इतपत ठिक आहे, पण कुत्र्याच्या नावावरती करोडो रुपयांची संपत्ती आहे, असं कधी पाहिले किंवा ऐकले आहे का? जास्तीत जास्त ह्या गोष्टी आपण चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत, पण प्रत्यक्षात तुम्ही करोडपती कुत्रा पाहिलाय का ? अक्षय कुमारचा (Akshay Kumar) एन्टरटेनमेंट (Entertainment) सिनेमा आठवतोय का? या चित्रपटात एक प्रसिद्ध हिरे व्यापारी आपल्या एन्टरटेनमेंट नावाच्या कुत्र्याला आपला वारसदार बनवतो आणि हा कुत्रा करोडपती होतो.

Gunther Dog
हे आहे जगातील एकमेव विषारी गार्डन, जिथे श्वास घ्याल तरी जीव गमवाल

मात्र हे आता प्रत्यक्षात घडलंय. जगातला खराखुरा करोडपती कुत्रा. त्याच नाव आहे 'गंथर फोर्थ' (Gunther Dog). त्याची संपत्ती किती आहे? हे जर तुम्ही ऐकलंत तर तुमचे डोळे पांढरे होतील. हा गंथर तब्बल 430 कोटीं रुपयांचा मालक आहे. तो चर्चेत आलाय त्याच्या 230 कोटींची एक प्रॉपर्टी विक्रीला काढल्यामुळे. त्याच्या प्रॉपर्टी मधील आता तो एक मोठी हवेली विकणार आहे.

अमेरिकेतल्या (America) मियामीमध्ये असलेली ही शानदार हवेली गंथरची आहे. त्याचा बाप गंथर थर्ड याच्या नावे त्याची मालकीण काऊंटेस कार्लोटा यांनी 1992 साली ही प्रॉपर्टी गंथर थर्डच्या नावावरती केली होती. गंथर थर्डच्या (Gunther Third) मृत्यूनंतर गंथर फोर्थ त्या संपत्तीचा मालक झाला आहे. दिवाणखान्यात फायरस्पेसच्या वरती गंथर फोर्थचं सोन्याचा मुलामा दिलेलं एक चित्रही टांगन्यात आलं आहे. बिस्केन चौपाटीचा व्ह्यू असलेल्या या हवेलीमध्ये 9 बेडरूम्स आणि 8 बाथरूम आहेत. आवारात एक शानदार स्वीमिंग पूलही आहे. आजुबाजुला घनदाट झाडी आहेत. हवेलीच्या दुसऱ्या बाजूनं संपूर्ण मियामी शहराचा नजारा दिसून येतो. एकेकाळी प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर मॅडोनादेखील या हवेलीची मालकीण राहिली होती.

Gunther Dog
Omicron च्या दहशतीमुळे जपानचा मोठा निर्णय! परदेशी प्रवाशांना प्रवेशावर बंदी

गंथर या संपत्तीचा मालक कसा झाला, याबाबत वाद आहेत. 1995 साली इटलीतील एका वर्तमानपत्रानं कार्लोटा नावाची कुणी महिला नव्हतीच असा दावा केला आहे. मात्र हवेलीच्या जुन्या मालकांनी कार्लोटानंच गंथरला संपत्ती दिल्याचं म्हटलं आहे. ते काही असो. हा कुत्रा 430 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे, हे मात्र खरं. म्हणतात ना. ''हर कुत्ते का दिन होता है''.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com