पाकिस्तानमध्ये तेहरीक-ए-तालिबानचा पोलिसांवरच हल्ला

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने गेल्या 14 वर्षांत पाकिस्तानी सुरक्षा दल आणि नागरिकांवर झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमागे हात आहे.
Tehrik-i-Taliban Pakistan attacks on police officers in khaibar pakhtun
Tehrik-i-Taliban Pakistan attacks on police officers in khaibar pakhtunDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानच्या (Pakistan) अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिओ लसीकरण कर्मचार्‍यांना सुरक्षा पुरवणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍यांवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP), ज्याला पाकिस्तानी तालिबान असेही म्हणतात त्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीटीपीने गुरुवारी इम्रान खान (Imran Khan) सरकारसोबत महिनाभर चाललेला युद्धविराम संपल्याची घोषणा केल्यानंतर हा हल्ला केला आहे.(Tehrik-i-Taliban Pakistan attacks on police officers in khaibar pakhtun)

नोव्हेंबरमध्ये दोन्ही बाजूंमधील शांतता चर्चेत युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. टीटीपी पाकिस्तानमधील लसीकरण मोहिमेला लक्ष्य करत आहे आणि मुलांची नसबंदी करण्याचा हा पाश्चात्य कट असल्याचा दावा करत आहे. प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने पाकिस्तान सरकारसोबत महिनाभर चाललेला युद्धविराम करार संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली आहे.आणि आता टीटीपीच्या या निर्णयामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शांतता कराराच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने गेल्या 14 वर्षांत पाकिस्तानी सुरक्षा दल आणि नागरिकांवर झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमागे हात आहे. या हल्ल्यांमध्ये 2014 मध्ये पेशावरमधील सैनिक शाळेवर झालेल्या हल्ल्याचाही समावेश आहे. या हल्ल्यात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या कराराचे पालन करण्यात पाकिस्तान सरकार अपयशी ठरल्याचा आरोप टीटीपीने केला आहे.

Tehrik-i-Taliban Pakistan attacks on police officers in khaibar pakhtun
तालिबान भारताला म्हणतंय 'थँक्स', दोन्ही देशाच्या मैत्रीवर तालिबानी नेत्यांचं भाष्य

टीटीपीने शुक्रवारी सांगितले की करारानुसार, दोन्ही बाजूंनी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत एक महिन्याचा युद्धविराम पाळण्यासही सहमती दर्शविली होती. निवेदनानुसार, दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात केवळ सरकारच अपयशी ठरले नाही तर सुरक्षा दलांनी डेरा इस्माईल खान, लक्की मारवत, स्वात, बाजौर, स्वाबी आणि उत्तर वझिरीस्तान येथेही छापे टाकून दहशतवाद्यांना ठार केले आहे टायबद्दल आता सरकारकडून अनेकांना ताब्यात घेण्यात आले. टीटीपीचे म्हणणे आहे की अशा परिस्थितीत युद्धविराम पुढे जाणे शक्य नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com